२७ मार्चपासून अडीच दिवस ‘या’ ३ राशींची
फाल्गुन कृष्ण पक्षातील द्वितीया तिथीला म्हणजेच २७ मार्च २०२४ ला चंद्राचे गोचर होणार आहे. चंद्र कोणत्याही राशीत फक्त अडीच दिवस राहतो पण जेव्हा चंद्र एखाद्या राशीत जातो आणि तिथल्या अन्य ग्रहांसह युती करतो तेव्हा मात्र त्या अडीच दिवसातच त्याचा प्रभाव प्रचंड स्वरूपात दिसून येऊ शकतो. यंदा होळीच्या नंतर अनेक ग्रहांचे गोचर, नक्षत्र परिवर्तन व अस्त-उदय होणार आहेत.
होळीच्या दिवशी चंद्र ग्रहण असल्याने चंद्राची शक्ती मावळली होती मात्र गोचर करून तूळ राशीत प्रवेश करताच चंद्राला आपले बळ पुन्हा प्राप्त होणार आहे. एक विशेष योगायोग म्हणजे चंद्र जेव्हा तूळ राशीत पोहोचेल तेव्हा तिथे अगोदरच उपस्थित असलेल्या गुरूंसह चंद्राची युती होणार आहे. परिणामी दोन्ही ग्रहांचे बळ एकवटून दुहेरी गजकेसरी राजयोग निर्माण होत आहे. चंद्राचे पुढील गोचर होण्याआधी म्हणजेच पुढील अडीच दिवस १२ पैकी काही राशींचे नशीब चांदण्यासारखे चमचमणार आहे. या लकी राशी कोणत्या हे पाहूया..
गजकेसरी योग बनल्याने ‘या’ राशींना मिळेल चांदण्याची छाया
तूळ रास (Libra Rashi Bhavishya)
ज्योतिषशास्त्रानुसार होळीनंतर २७ मार्चला चंद्र तूळ राशीतच प्रवेश करून गजकेसरी राजयोग निर्माण करणार आहे. चंद्र, बुध व गुरुची युती तूळ राशीला या अडीच दिवसांमध्ये अत्यंत समृद्ध करू शकते. या राशीच्या मंडळींना पुढील अडीच दिवसात मागील कित्येक वर्षात अडकून पडलेले प्रश्न सोडवता येतील. इतकंच नाही तर पदोन्नती व पगारवाढीचा सुद्धा योग दिसून येत आहे.
ज्यामुळे केवळ वर्तमानातच नव्हे तर भविष्यातील मिळकतीची सुद्धा स्थिती बळकट होईल. अडीच दिवसांमध्ये धनलाभ झाल्याने आपण काही महत्त्वाच्या इच्छा पूर्ण करण्याच्या दिशेने काही पाऊल पुढे जाऊ शकता. तुमच्या राशीत भावंडे व मित्रांच्या रूपात आर्थिक लाभाची चिन्हे दिसत आहेत. इतरांचे मन दुखावण्याचा प्रसंग येईल, विवेक बाळगावा.
वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)
तूळ राशीत डबल गजकेसरी राजयोग बनल्याने वृश्चिक राशीला अत्यंत लाभदायक कालावधी अनुभवता येणार आहे. या कालावधीत तुम्हाला व्यवसायातून मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात गुंतवणूक हिताची ठरेल. होळीच्या वेळी खरमास सुरु होतो व कालावधीत शुभ कार्य थांबतात पण ज्या दिवसापासून गजकेसरी राजयोग निर्माण होत आहे तेव्हा मात्र नव्या सुरुवातीला उत्तम फायदा मिळू शकतो. गजकेसरी राजयोगाच्या निर्मितीने आपला भाग्योदय होण्याची चिन्हे आहेत. आपल्याला अडीअडचणीच्या काळात मदत केलेल्या व्यक्तींना या वेळी विसरू नका.
मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)
गजकेसरी राजयोग हा माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवून देणारा योग म्हणून ओळखला जातो. मकर राशीच्या व्यक्तींना या कालावधीत माता लक्ष्मीचा पुरेपूर आशीर्वाद मिळणार आहे. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते तसेच आर्थिक मिळकतीचे स्रोत सुद्धा सक्षम होऊ शकतात. या कालावधीत घरी एखादे मंगल कार्य आयोजित केले जाईल. लहानश्या प्रवासाचा सुद्धा योग आहे. संपत्ती व संततीसाठी तुम्हाला नशिबाची साथ लाभू शकते. या कालावधीत काही महत्त्वाचे बदल घडवून आणणारे निर्णय घेऊ शकता.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)