Wednesday, September 27, 2023
Homeअध्यात्मलक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय! आर्थिक उत्पन्नात होईल वाढ

लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय! आर्थिक उत्पन्नात होईल वाढ

शास्त्रानुसार माता लक्ष्मीला धन लक्ष्मी, वरलक्ष्मी, महालक्ष्मी अशा अनेक नावांनी ओळखले जाते. एका जागी जास्त काळ टिकत नसल्याने त्यांना चंचल असेही म्हणतात. माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते. म्हणूनच त्यांची पूजा केल्याने वैभव, संपत्ती आणि समृद्धी मिळते. असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याला कधीही पैशाची कमतरता किंवा भौतीक सुखांची कमतरता भासत नाही. म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकजण विविध उपायांचा अवलंब करतो. ज्योतिष शास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे केल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. हे प्रभावी उपाय जाणून घ्या.

शुक्रवारी माता लक्ष्मीच्या मंदिरात शंख, गाई, कमळाचे फूल, माखणा, बताशे, खीर आणि गुलाबाचे अत्तर अर्पण करणे शुभ मानले जाते. असे केल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखर खायला द्या. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल, ज्यामुळे तुमच्या कामातील प्रत्येक अडथळे दूर होतील.

शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच श्रीयंत्राची पूजा करावी. यासोबतच श्री सूक्ताचे पठण करावे. असे केल्याने माता लक्ष्मी लवकरच प्रसन्न होईल.

कमळाचे फूल माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. म्हणूनच शुक्रवारी माता लक्ष्मीच्या चरणी कमळाचे फूल अर्पण करावे. कमळावर विराजमान असलेल्या माता लक्ष्मीची पूजा करावी. लक्ष्मीचा फोटो किंवा मुर्ती ही भंगलेल्या स्थितीत नसावी. तसेच एकापेक्षा जास्त लक्ष्मीची मुर्ती किंवा फोटो नसावे.

वैवाहिक जीवनात काही वाद होत असतील तर शुक्रवारी बेडरूममध्ये लव्ह बर्ड्सचे चित्र लावावे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन