फक्त २४० रुपयात Airtel चा १.५ जीबी डेटा प्लान!

भारतात मंथली रिचार्ज प्लानला खूप महत्त्व देत आहेत. परंतु, मंथली प्लानच्या तुलनेत तिमाही, सहामाही आणि वार्षिक प्लानची वैधता असलेले प्लान स्वस्त आहेत.

या प्लानमध्ये कमी किंमतीत जास्त वैधता ऑफर केली जाते. एअरटेलचा असाच एक प्लान आहे. या प्लानची किंमत ७१९ रुपये आहे. या प्लानमध्ये मंथली प्लानच्या तुलनेत जास्त डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय, पैशांची बचत सुद्धा होते. या प्लानमध्ये अनलिमिटेड ५जी डेटा ऑफर केला जातो.

एअरटेलच्या या रिचार्ज प्लानमध्ये ८४ दिवसाची वैधता ऑफर केली जाते. सोबत या प्लानमध्ये रोजच्या हिशोबानुसार, १.५ जीबी डेटा ऑफर केला जातो. हा प्लान अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग सोबत येतो.

या प्लानमध्ये रोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय, या प्लानमध्ये अनलिमिटेड ५जी डेटा मिळतो. डेली डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 64kbps राहते. या प्लानमध्ये Xstream अॅप, फ्री हॅलो ट्यून आणि विंक म्यूझिकचे फ्री सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते. याशिवाय, अॅप एक्सक्लूसिव्ह २ जीबी फ्री डेटा कूपन दिले जाते.

एअरटेलचा ७१९ रुपयाचा प्लान मंथली खर्चाच्या हिशोबानुसार, २४० रुपये आहे. जर या प्लानची तुलना २६५ रुपयाच्या प्लानशी केली तर मंथली प्लान मध्ये रोज १ जीबी डेटा दिला जातो.

या प्रमाणे तुम्ही ७१९ रुपयाच्या प्लानमध्ये २४० रुपयाच्या खर्चात दर महिना १४ जीबीहून जास्त डेटा मिळवू शकता. सोबत तीन महिन्यासाठी तुम्ही ४५ रुपयाचा बचत सुद्धा करू शकता.

Leave a Comment