होळी हा सण का साजरा केला जातो?

मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण साजरे केल्या जातात आणि त्या सणामागे आपले पूर्वज आपल्याला सण का केला जातो? याबद्दलची एक गोष्ट हे नक्कीच सांगत असतात. आज आपण होळी या सणाबद्दल ची माहिती पाहणार आहोत. ज्यामध्ये होळी हा सण का साजरा केला जातो? होलिका दहन का केले जाते? याची माहिती आपण आज पाहणार आहोत.

 

प्रल्हाद नावाचा एक विष्णू भक्त होता व त्याच्या वडिलांचे नाव हिरण्यकश्यपू असे होते. त्याला असे वरदान होते की, तो कोणत्याही माणसाकडून किंवा प्राण्यांकडून मारला जाणार नाही. त्याचबरोबर प्रल्हाद हा विष्णू भक्त असल्यामुळे तो दिवस आणि रात्र विष्णूची आराधना पूजा करीत असे. हे त्याच्या वडिलांना आवडत नव्हते. म्हणून तो वेगवेगळ्या प्रकार प्रकारे प्रल्हाद ला मारण्याचा प्रयत्न करत होता.

 

परंतु त्याच्यावर विष्णू ची कृपा असल्यामुळे तो त्यामध्ये मारला जात नव्हता. एके दिवशी या हिरण्यकश्यपू ने आपल्या बहिणीला बोलावून घेतले. त्याच्या बहिणीचे नाव होलिका असे होते. होलीका ला अग्नीपासून काहीही होणार नाही ते अग्नीमध्ये जळणार नाही असा वरदान प्राप्त होता. म्हणून त्याने आपल्या मुलाला म्हणजेच प्रल्हादला व होळीकेला एका अग्नीमध्ये बसायला सांगितले.

 

त्यावेळी प्रल्हाद हा विष्णूच्या नामस्मरणातच गुणगुण होता. होलीकेने आपल्या मांडीवर त्याला घेऊन ती अग्नीमध्ये बसली. या अग्नीमध्ये होलिका जळून खाक झाली. परंतु प्रल्हाद ला एकही जखम झाली नाही. तो जिवंत राहिला.

 

याच कथेची आठवण म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये होलिका दहन केले जाते. हे होळीच्या दिवशी केले जाते. ही संपूर्ण कथा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे . यामुळेच होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन साजरे केले जाते. होलिका वाहनावर लोक आपली नकारात्मकता जाळतात. आपल्या सर्व संकटे जळून खाक होतील यासाठी ही होलिका दहन केली जाते.

 

अशाप्रकारे होलीशी संबंधित ही कथा आहे. त्याचा अर्थ असा होतो की, आपल्या सर्व वाईट शक्ती, बाधा या होळीमध्ये जळून खाक होते.

Leave a Comment