मित्रांनो, आपल्या भारतीय परंपरेनुसार अनेक समारंभ केली जातात. या समारंभाची तयारी आधीपासूनच आपल्या घरामध्ये चालला असते. तसेच काही सण हे अत्यंत शुभ मानले जातात तर, काही सणांमध्ये शुभ कामे केली जात नाही. की ज्यामध्ये लग्न समारंभ, साखरपुडा, वास्तुशांती अशा कोणत्याही शुभकार्यांना या सणाआधी केले जात नाही.
असा सण म्हणजे होळी. या होळीच्या सणाला कोणत्याही प्रकारचे समारंभ केले जात नाही. कोणतेही शुभ कार्य होळीपासून करू नयेत. याचीच माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
होळीचा सण म्हणजे होलिका दहन असते. हा विधी होलिकाच्या कथेवरून घेतला गेला आहे.
ज्याने हिरण्यकशिपूचा मुलगा प्रल्हादाला आगीच्या ज्वाळांनी मारण्याचा प्रयत्न केला . होलिकाला अग्नीपासून मुक्त राहण्याचे वरदान मिळाले असले तरी ती जळून राख झाली होती, तर प्रल्हाद असुरक्षित राहिला. होळीदहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे.
त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते. होळीच्या दुसर्याच दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. या आनंदातच वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. या होळीचा सणा आधी आठ दिवस होली अष्टक सुरू होतो. म्हणजेच होळीचा आधीचे आठ दिवस असतात.
ते होळी अष्टक म्हणाले जातात. या अष्टक चालू असताना कोणत्याही प्रकारची समारंभ केली जात नाही. अशी परंपरा हिंदू धर्मामध्ये आहे. शुभ कार्य केले जात नाही. यामध्ये लग्नकार्य, साखरपुडा, वास्तुशांती, कसा अनेक शुभ कार्यांचा समावेश होतो. यावर्षी हे होळी अष्टक फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टकापासूनच म्हणजेच 17 मार्चपासूनच सुरू झालेली आहे.
या होळी अष्टकाच्या काळामध्ये होळीची तयारी करण्यास सुरुवात केली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार असे म्हटले जाते की, या होळी अष्टका मध्ये धार्मिक कार्य करावे पण शुभ कार्य करू नये. या आठ दिवसाच्या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे लग्न, साखरपुडा, वास्तुशांती, मुंज कोणत्याही प्रकारचा व्यवसायाची सुरुवात, कोणतेही नवीन काम अजिबात करू नये.
अशाप्रकारे या होळी अष्टका मध्ये कोणत्याही प्रकारची शुभकार्य करू नये असे आपल्या हिंदू धर्मांना सांगितले गेले आहेत.