२० मार्च २०२४ ला फाल्गुन मासातील पहिली एकादशी असणार आहे. एकादशी तिथी बुधवारी रात्री २ वाजून २३ मिनिटांपर्यंत कायम असणार आहे. या तिथीला आमलकी एकादशी म्हणून ओळखले जाते. पंचांगानुसार, २० मार्चला रात्री १० वाजून ३८ मिनिटांपर्यंत रवी व पुष्य योग असणार आहे. एकादशीच्या या तिथीला मेष ते मीन राशींचे नशीब साथ देणार का हे पाहूया..
March 2024: आमलकी एकादशी विशेष: मेष ते मीन राशीचे भविष्य
मेष:-कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. खाण्या-पिण्याची हौस भागवाल. मनाजोगा आर्थिक लाभ होईल. गायन कलेत प्रगती होईल. घरासाठी काही वस्तु खरेदी कराल.
वृषभ:-आवडत्या कामात गुंग व्हाल. दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. महिलांची नटण्या-मुरडण्याची हौस पूर्ण होईल. सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. चैनीत दिवस घालवाल.
मिथुन:-मानसिक चंचलतेला आवर घालावी. ज्येष्ठांची मनापासून सेवा कराल. एखादी चांगली संधि चालून येईल. दानधर्म करण्याचा योग येईल. तीर्थ यात्रेसाठी नाव नोंदवाल.
कर्क:-तुमची समाजप्रियता वाढेल. मित्रपरिवारात वाढ होईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. कामात स्त्रियांची चांगली मदत मिळेल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.