यंदा किती तारखेला साजरा होणार गुढी पाडवा? अशाप्रकारे करा गुढीची पूजा

हिंदूंमध्ये गुढीपाडव्याला (Gudi Padwa) विशेष महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती झाली. या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते. या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय घुसखोरांचा युद्धात पराभव केला असा आणखी एक समज आहे.

त्यामुळेच गुढीपाडव्याच्या दिवशी वाईट गोष्टींचा अंत होतो असे म्हटले जाते. या दिवशीपासून मराठी नवीन वर्षाची सुरूवात होत असते. त्या निमित्त घरोघरी गुडी उभारल्या जातात. गुडी ही समृद्धीचे प्रतिक म्हणून ओळखल्या जाते. जीवनात सुख-समृद्धी येते.

गुढी पाडव्याचा शुभ मुहूर्त

प्रतिपदा तारीख प्रारंभ : 8 एप्रिल 2024 सकाळी 11:50 वाजता प्रतिपदा समाप्त होईल : 9 एप्रिल 2024 रोजी रात्री 08:30 वाजता

 

गुढी पाडवा पूजा पद्धत

1. गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी सर्व प्रथम स्नान वगैरे केले जाते.

2. यानंतर मुख्य दरवाजा आंब्याच्या पानांनी सजवला जातो.

 

3. यानंतर घराच्या एका भागात गुढी उभारली जाते. आंब्याची पाने, फुले, कपडे इत्यादींनी सजवलेले असते.

 

4. यानंतर ब्रह्मदेवाची पूजा करून गुढी उभारली जाते.

 

5. गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूची विधीपूर्वक पूजा केली जाते.

 

गुढीपाडव्याच्या दिवशी लोक नवीन कपडे घालतात. या उत्सवात पुरणपोळी आणि श्रीखंडाचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. गोड भातही बनवला जातो. याला साखर भात असेही म्हणतात.

 

वानर राजा बालीवर विजय

रामायण काळात दक्षिण भारत बालीच्या जुलमी राजवटीत होता. सीताजींचा शोध घेत असताना जेव्हा प्रभू राम सुग्रीवाला भेटले तेव्हा त्यांनी श्रीरामांना बालीच्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर प्रभू रामाने बालीचा वध करून तेथील लोकांना त्याच्या कुशासनातून मुक्त केले. हा दिवस चैत्र प्रतिपदेचा होता असे मानले जाते. म्हणूनच या दिवशी गुढी किंवा विजय पताका फडकवली जाते.

 

शालिवाहन शक संवत

एका ऐतिहासिक आख्यायिकेनुसार शालिवाहन नावाच्या कुंभार मुलाने मातीच्या सैनिकांची फौज बनवली आणि त्यांच्यावर पाणी शिंपडून त्यात प्राण फुंकले आणि या सैन्याच्या मदतीने शत्रूंचा पराभव केला. या विजयाचे प्रतीक म्हणून शालिवाहन शक संवताची सुरुवातही मानली जाते.

 

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Leave a Comment