होळीवर चंद्रग्रहणाची छाया, जाणून घ्या सर्व राशींवर काय परिणाम होईल आणि..

यंदा 25 मार्चला धुळीवंदन साजरी केली जाईल. फाल्गुन शुक्ल पक्ष पौर्णिमेला होळी असेल. यावेळी वर्षातील पहिले चंद्रग्रहण होळीच्या दिवशी होणार आहे. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार चंद्रग्रहण 25 मार्चला सकाळी 10 वाजून 30 मिनिटांना सुरू होईल. हे चंद्रग्रहण दुपारी 3 वाजून 2 मिनिटांना संपेल. मात्र, हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नाहीये. यामुळे कोणत्याच राशीवर या चंद्रग्रहणचा काही परिणाम हा होणार नाहीये. या चंद्रग्रहणचा परिणाम कोणत्याच राशीवर होत नसल्याने आपण निवांत होऊन होळी साजरी करू शकतो. मात्र, चंद्रग्रहण असल्याने काही गोष्टी पाळाव्या लागतील.

चला तर जाणून घेऊयात होळीला चंद्रग्रहणामध्ये कसे असेल राशी भविष्य

 

मेष – मेष राशीसाठी हे चंद्रग्रहण संमिश्र असणार आहे. फक्त तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. तसेच श्री विष्णूचा जप करा, ते शुभ होईल.

वृषभ – वृषभ राशीच्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागेल. त्यांना त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. तसेच महादेवाची पूजा करा. सर्व प्रकारचे मंगल असेल.

 

मिथून – मिथुन राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण शुभ संयोग घेऊन येईल. मानसिक तणाव दूर होईल तसेच रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. आरोग्य चांगले राहील आणि कौटुंबिक आनंद शांतीपूर्ण राहील.

 

कर्क – कर्क राशीच्या लोकांना यावेळी विशेष काळजी ही घ्यावी लागेल. आरोग्य, कौटुंबिक आणि मानसिक तणाव वाढण्याची दाट शक्यता आहे, यामुळे काळजी घ्या.

 

सिंह – सिंह राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण शुभ ठरेल. घरात आनंदी वातावरण राहिल आणि शुभ गोष्टी घडतील. व्यापारामध्ये मोठी प्रगती होणार.

 

कन्या – राशाच्या लोकांनी कुटुंबाकडे लक्ष द्यावे. व्यापार आणि कुटुंबामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. दुर्गा देवीचा जप करणे फायदेशीर ठरेल.

 

तुळा – तुळा राशींच्या लोकांसाठी देखील हे ग्रहण ठिक ठरेल. या राशींच्या लोकांना आजूबाजुच्या गोष्टींवर लक्ष द्यावे लागेल. पत्नीकडे लक्ष द्या आणि आपल्या कुटुंबाकडे देखील लक्ष द्या.

 

वृश्चिक – वृश्चिक राशीच्या लोकांनी देखील विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांनी ग्रहणाच्या वेळी रागावू नये. खोटे बोलू नये. भांडण करू नये. यामुळे समस्या वाढू शकतात.

 

धनु – धनु राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण चांगले राहील. विशेष म्हणजे त्यांना ग्रहणाच्या वेळी लाभ मिळू शकतो. कौटुंबिक शांतता राहील. मन शांत राहील. व्यवसाय, नोकरीत चांगली प्रगती होईल.

 

मकर – मकर राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण शुभ नक्कीच असणार आहे. कुटुंबात समृद्धी येईल. मानसिक तणावापासून अंतर राहील. मात्र, काही गोष्टी या ग्रहणात पाळा.

 

कुंभ – कुंभ राशीच्या लोकांसाठी हे ग्रहणाचा संमिश्र राहिल. यादरम्यान कोणतेही चुकीचे काम करू नये. हेच नाही तर कोणाचाही अपमान अजिबात करू नका. भगवान विष्णूचे ध्यान करावा.

 

मीन – मीन राशीच्या लोकांसाठी या ग्रहणाचा संमिश्र प्रभाव राहील. मानसिक शांतता लाभू शकते. मात्र, यादरम्यान कुटुंबात मतभेद होण्याची दाट शक्यता आहे. राग करण्यापासून दूर राहिलेले फायदेशीर ठरेल.

 

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Leave a Comment