होळीला चंद्रग्रहणाबरोबर राहू-सूर्य संयोग; बालारिष्ट दोषामुळे ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार? धनहानीचे संकेत

वर्षातील पहिले चंद्रग्रहण होळीच्या दिवशी म्हणजेच २५ मार्च रोजी होत आहे. मात्र, भारतात हे ग्रहण दिसणार नाही; परंतु ग्रहणाचा परिणाम १२ राशींच्या जीवनावर होऊ शकतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सध्या मीन राशीमध्ये सावलीचा ग्रह राहू आहे. सूर्यही मीन राशीत असेल. अशा स्थितीत होळीच्या दिवशी सूर्य आणि राहूच्या संयोगामुळे ‘ग्रहण योग’ही तयार होत आहे; ज्यामुळे काही राशींसाठी समस्या निर्माण होऊ शकतात.

त्याचबरोबर २४ मार्च रोजी दुपारी २.२० वाजता उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात चंद्र केतूसह कन्या राशीत असेल. अशा स्थितीत दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे बालारिष्ट दोष तयार होत आहे. होळीमध्ये ग्रहांच्या अशा स्थितीसह चंद्रग्रहणामुळे काही राशींच्या लोकांना फायदा होईल; तर काही राशींच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊ कोणत्या राशींच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

 

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी ग्रहणदोषाबरोबरच बालारिष्ट दोष आणि चंद्रग्रहण अनुकूल ठरणार नाही. या राशीच्या लोकांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता आहे. तुमच्या ध्येयांचा पाठपुरावा करताना तुम्हाला काही तडजोडी कराव्या लागू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही जास्त फायदा होणार नाही. नोकरीत तुम्हाला दबावाचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला सहकाऱ्यांकडून अडचणी आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते.

 

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठीही होळीचा दिवस फारसा चांगला राहणार नाही. या राशीच्या लोकांना काही ना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जीवनात अनेक प्रकारचे अडथळे येऊ शकतात. तुमच्या जोडीदाराबरोबर काही मुद्द्यांवरून मतभेद होऊ शकतात. करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वरिष्ठांकडून सहकार्य मिळणार नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला छोट्या छोट्या कामांतही जास्त मेहनत करावी लागू शकते. त्यासह तुम्ही अचानक नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. व्यवसायातही ‘करा वा मरा’ अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना थोडा विचार करूनच घ्या.

मीन

होळीचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी खूप अडचणी निर्माण करू शकतो. एकीकडे या राशीच्या सातव्या घरात केतू आणि चंद्राच्या संयोगामुळे बालारिष्ट दोष तयार होत आहे. त्यामुळे मीन राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. विशेषत: मुलांबाबत थोडे सावध राहा. त्याचबरोबर ग्रहणदोषामुळे मीन राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. आत्मविश्वास कमी होऊ शकतो.

विनाकारण नोकरी बदलण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या कामात असमाधानी असू शकता. व्यवसायाच्या क्षेत्रातही थोडे सावध राहण्याची गरज आहे. काही फायदा होऊ शकतो; परंतु सावध न राहिल्यास नुकसान होऊ शकते. तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतात. त्याचबरोबर आयुष्यात काही अडचणी येऊ शकतात.

Leave a Comment