सूर्य करणार मेष राशीमध्ये प्रवेश, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अचानक धनलाभ

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याला सर्व ग्रहांचा राजा मानले जाते. ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सूर्याचे राशी परिवर्तन सू्र्य संक्रांती म्हणून ओळखले जाते.सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे इतर राशींच्या लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकला जातो.ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य मार्च महिन्यात मीन राशीमध्ये विराजमान आहे. मीन राशी ही गुरूची रास आहे. मार्च महिन्यानंतर १३ एप्रिल ला सूर्य मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे.

आणि १४ मे पर्यंत या राशीत विराजमान राहणार आहे. मेष राशी सूर्यदेवाची उच्च राशी असते. या राशीचा स्वामी ग्रह मंगळ असतो. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कोणताही ग्रह त्याच्या उच्च राशीमध्ये प्रवेश करतो, याचा शुभ परिणाम काही राशीच्या लोकांवर दिसून येतो.सूर्य उच्च राशी मेषमध्ये प्रवेश करत असल्यामुळे याचा फायदा अन्य राशींवर दिसून येईल. त्या राशी कोणत्या, हे आज आपण जाणून घेऊ या.

 

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्याचे मेष राशी प्रवेश फायदेशीर ठरू शकतो. मिथुन राशीमध्ये सूर्य अकराव्या स्थानावर असणार आहे. त्यामुळे यांचे अपूर्ण कामे पूर्ण होतील. आर्थिक परिस्थिती सुधारू शकते.धनलाभाच्या भरपूर संधी मिळतील. नोकरीच्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना मोठी संधी मिळू शकते. आर्थिक वृद्धी आणि पदोन्नतीचा योग दिसून येत आहे. कुटूंबातील लोकांचा साथ मिळेल.

कर्क

कर्क राशीमध्ये सूर्य दहाव्या स्थानावर विराजमान असणार. अशात या राशींना त्यांच्या कर्मानुसार फळ मिळू शकते. या लोकांचा आत्मविश्वास उत्तम राहिल आणि मान सन्मान वाढेल.या लोकांनी ज्या गोष्टी ठरवल्या त्या पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना सरकारी नोकरीची संधी मिळू शकते. कुटूंबाचे सहकार्य लाभेल. या राशीचे लोक त्यांचे ध्येय गाठू शकतील. चांगल्या नशीबामुळे अपूर्ण काम लवकर पूर्ण होतील.

 

धनु

धनु राशीमध्ये सूर्य पाचव्या स्थानावर असणार आहे. अशात धनु राशीला धनसंपत्तीच्या अनेक संधी मिळतील.सुख सुविधांचा लाभ घेता येईल. आर्थिक कमाईचे नवीन स्त्रोत दिसून येईल. नवीन कामाची प्रशंसा होईल. आर्थिक कार्यात सुधार होईल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. मान सन्मान वाढेल. नोकरी करणाऱ्या लोकांना आणखी नोकरीच्या नवीन संधी येतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळेल.

 

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Leave a Comment