होळीपूर्वी अडचणीत येऊ शकतात ‘या’ राशी; शनिदेवाचा होऊ शकतो त्रास

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. शनि हा कर्मानुसार फळ देणारा ग्रह आहे. यालाच न्यायाची देवता सुद्धा म्हटले जाते. शनि देव माणसाच्या कर्मानुसार त्याला फळ देतो. शनिला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी जवळ पास अडीच वर्ष लागतात. सध्या शनि कुंभ राशीमध्ये विराजमान आहे.२०२५ मध्ये शनि कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. १८ मार्च सकाळी ७ वाजून ४९ मिनिटांनी शनिचा उदय होणार आहे. या दरम्यान शनिचा उदय होत असल्यामुळे अनेक राशींना फायदा होणार आहे तर काही राशींवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आज आपण त्या राशींविषयी जाणून घेणार ज्यांच्या अडचणी या काळात वाढू शकतात.

वृश्चिक
शनि वृश्चिक राशीच्या चौथ्या स्थानावर आहे.त्यामुळे या राशीचे लोकांनी त्यांच्या आईवडिलांच्या जेवणाची विशेष काळजी घ्यावी. कुटूंबात कोणत्या तरी कारणावरून वाद होऊ शकतो. मानसिक तणावाचा सामना होऊ शकतो. या काळात अति जास्त आत्मविश्वास या लोकांच्या अडचणी वाढवू शकतात. या लोकांचे मेहनतीचे फळ इतर कोणालाही मिळू शकते. अशा वेळी मेहनतीबरोबर सतर्क राहणे गरजेचे आहे.
कर्क
कर्क या राशीच्या आठव्या स्थानावर शनिचा उदय होणार आहे. अशा वेळी कर्क राशीच्या लोकांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. चुकूनही दूर्लक्ष केले तरी हे लोकं गंभीर आजाराचा सामना करू शकतात. व्यवसायात नुकसान होऊ शकते. या काळात या लोकांनी सांभाळून राहणे गरजेचे आहे.यश मिळवण्यासाठी या लोकांनी लहान मार्ग निवडू नये. या लोकांना नशीबाचा साथ मिळेल पण आईच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

मीन
या राशीच्या बाराव्या स्थानावर शनिचा स्थानावर उदय होणार आहे. अशात या राशीच्या लोकांनी परिस्थिती मिश्र स्वरुपाची दिसून येईल. आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. या वेळी लहान मोठ्या आजारांकडे दूर्लक्ष करू नका नाहीतर गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. अशात या राशीच्या लोकांचा जास्तीत जास्त पैसा खर्च होऊ शकतो ज्यामुळे बचत करू शकणार नाही. घरातील वयोवृद्ध लोकांची विशेष काळजी घ्यावी.

 

Leave a Comment