मित्रांनो, आपल्या भारतीय परंपरानुसार महिलांना लक्ष्मीचे स्थान दिले जाते. असे म्हटले जाते की, ज्या घरामध्ये महिला आहेत त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि घरातील महिलेमुळे त्यांच्या केलेलं कर्म किंवा कार्यामुळे घरातील लक्ष्मी देखील टिकून राहत असते. जर आपल्याला वाटत असेल आपल्या घरामध्ये देखील लक्ष्मी टिकून राहावे. घरात धनधान्याची बरकत द्यावे.
घरातील पैसा टिकून राहावा. घरामध्ये लक्ष्मीची कृपा व्हावी. घरात सकारात्मक शक्तींचा वास यावा. घरातील सर्व लोकांचे आरोग्य चांगले राहावे. घरातील सर्व सुखी समाधानी आणि सुदृढ राहावे. यासाठी महिलांनी दररोजची कामे कशी करावी? कधी करावेत? या सर्वांबद्दलची माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
घरातील महिलांनी कधीही उशिरापर्यंत झोपू नये. सकाळ लवकर उठून आपली नित्यकामे करुन आपण अंघोळ करावी. अंघोळ झाल्यानंतर सर्वात आधी आपला घराचा मेन दरवाजा उघडावा. दरवाजा उघडल्यानंतर घराच्या उंबरठ्यावर थोडेसे पाणी शिंपडावे. त्यानंतर बाहेर जाऊन थोडेसे पाणी शिंपडावे. हे झाल्यानंतर प्रथम सूर्याला अर्ग्या द्यावा
हे काम आटोपल्यानंतर प्रथम उंबरठ्याची पूजा करावी. उंबरठा ची पूजा करून झाल्यावर तुळशीची पूजा करावी. तिला पाणी व्हावे. ही सर्व कामे आटोपल्यानंतर प्रथम देवघरात जाऊन देवांची पूजा करावी. देवपूजा झाल्यानंतर मगच स्वयंपाक घरामध्ये प्रवेश करावा. मग बाकीची सर्व कामे आवरवी. त्यानंतर सायंकाळच्या वेळेस सायंकाळ होण्याआधी घरातील सर्व केरकचरा काढावा.
केर कचरा काढून झाल्यानंतर देवपूजा करून दिवे लावायचे. दिवा लावल्यानंतर तुळशीची पूजा करावीत. तुळशीत देखील दिवा लावा. हे सर्व झाल्यानंतरच स्वयंपाक घरात प्रवेश करावी. अशा प्रकारे जर घरच्या महिलांनी दररोज कामे केले तर, नक्कीच लक्ष्मी घरामध्ये टिकून राहील. घरामध्ये सुख शांती आणि समाधान राहील. घरात सतत पैशाची बरकत होईल. पैसा घरामध्ये टिकून राहिल. घरातील सर्व कामांमध्ये यश निर्माण होईल.
अशाप्रकारे तुम्ही देखील ही दररोजची कामे करून बघा. नक्कीच तुमच्या घरामध्ये समाधान शांतता वाटेल. घरात लक्ष्मीची कृपा दृष्टी होईल. घरातील सर्व लोकांचे आरोग्य चांगले राहील.