घरात भरभराट राहण्यासाठी या मंत्राचा जप करावा..

मित्रांनो, आपल्याला असे कायम वाटत असते की, आपल्या घरामध्ये सर्व सुख सुविधा असल्या पाहिजेत. घरात पैशाची बरकत असवी. लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर असावी. घरात कोणत्याही प्रकारचे नकारात्मक शक्ती नसावी. घरामध्ये सदैव सुख असावे. दुःखाची सावली घरामध्ये नसावी. असे सर्वांनाच वाटत असते.

 

म्हणूनच आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत की, जो उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची टंचाई कधीही भासणार नाही. घरामध्ये भरभराटी होईल. घरात पैसा टिकून राहील. लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल. सकारात्मक शक्तींचा वास घरामध्ये होईल. असा हा उपाय कधी करावा व कोठे करावा? याची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

आपल्या घरामध्ये जर कितीही कष्ट करून देखील पैसा टिकून राहत नसेल. घरामध्ये पैसा येऊन ही या ना त्या कारणांनी तो सतत खर्च होत असेल. घरात पैसा टिकून राहत नसल्यामुळे सतत भांडणे होत असतील. शांतता घरामध्ये टिकून राहिली नसेल. अशावेळी आपल्याला काय करावे? हे सुचत नाही. प्रत्येकाला असे वाटते की, घरामध्ये पैसा टिकून राहावा. बचतीचे प्रमाण वाढावे. घरात भरभराट व्हावी.

 

हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये पैशाची टंचाई कधीही भासणार नाही. आपण सदैव श्री लक्ष्मीची आराधना करायला हवी. लक्ष्मी बरोबरच श्री गणेशाची देखील पूजन केले पाहिजे. लक्ष्मी आणि कुबेर या दोघांचे देखील पूजन केले पाहिजे. लक्ष्मी ही धनाची देवी आहे व कुबेर ही धनाचा देवता मानला जातो. म्हणूनच आपण एक असा उपाय पाहणार आहोत की तो कुबेराशी निगडित आहे.

 

जर कुबेर प्रसन्न असतील तर घरामध्ये कधीही पैशाची टंचाई भासणार नाही. कुबेराला प्रसन्न करण्यासाठी आपण त्याची सतत पूजन केले पाहिजे. त्यांचा मंत्राचा जप केला पाहिजे. याच मंत्राचा जप करून घरात बचतीचे प्रमाण वाढते. तो मंत्र म्हणजे

ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये । धनधान्यसमृद्धिं मे देहि दापय स्वाहा।।

असा हा कुबेराचा मंत्र आपल्याला रोज 11 वेळेस जप करायचा आहे. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा लवकरात लवकर झालेला दिसून येईल.

 

दररोज मनो भावाने श्रद्धेने जर आपण या मंत्राचे जप केले तर, नक्कीच आपल्याला घरातील असलेल्या सर्व समस्या निघून जाऊन घरामध्ये बचतीचे प्रमाण वाढेल. घरात पैसा टिकून राहील. लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल. तसेच कुबेराचे देखील कृपा आपल्यावर होईल.

 

अशाप्रकारे तुम्ही देखील हा उपाय नक्कीच करून बघा. त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच दिसून येईल. कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. घरामध्ये भरभराटी होईल.

Leave a Comment