साप्ताहिक राशिभविष्य : 11 मार्च ते 17 मार्च 2024 

शुभयोग तर वृषभ राशीसाठी व्यस्त आठवडा आहे. सिंह राशीसाठी आठवडा भाग्याचा तर

कन्या राशीला कामात अडथळ्यांचा सामना करावा लागेल. धनू राशीचे धार्मिक, सामाजिक कामात योगदान असेल. तुमच्या राशीत आठवड्याबद्दल काय लिहिले आहे. तुमचा आठवडा कसा असेल पाहून साप्ताहिक राशिभविष्य

 

मेष – आकस्मिक धनलाभाचा योग

 

मेष राशीच्या लोकांना हा आठवडा शुभयोग घेऊन येत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला आकस्मिक मोठा धनलाभ होईल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. व्यापारात अपेक्षित प्रगती होईल. पण देवाणघेवाणीत सावध राहा आणि इतरांवर डोळे बंद करून विश्वास ठेऊ नका. या काळात एखाद्या विद्वान व्यक्तीशी तुमचे संबंध येतील, भविष्यात या लोकांच्या मदतीने एखाद्या लाभदायक योजनेत सहभागी होता येईल. महिलांची रुची धार्मिक कार्यात वाढेल. आठवड्याच्या अखेरीस एखाद्या शुभ किंवा धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. संततीसंबंधी एखाद्या मोठ्या समस्येवर समाधान होईल, त्यामुळे मानसिक शांती मिळेल. प्रेमसंबंधाच्या दृष्टीने हा आठवडा अनुकूल राहील. जोडीदाराप्रति प्रेम आणि सौहार्द वाढेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य राहील.

भाग्यकारक रंग : गुलाबी

भाग्यांक अंक : 4

 

वृषभ – विचारपूर्वक पावले उचला

 

वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्यात जीवनातील प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावे लागणार आहे, अन्यथा अडचणींना तोंड द्यावे लागेल. आठवड्याच्या सुरुवातीला कामाचे ओझे जास्त राहील, त्यामुळे तुम्ही कुटुंबाला फारसा वेळ देऊ शकणार नाही. या व्यस्त काळात मित्रांचे पुरेसे सहकार्य मिळणार नाही. त्यामुळे हातातील कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्तीचे कष्ट आणि प्रयत्न करावे लागतील. जमीन आणि घराशी संबंधित वाद चिंतेचे मोठा कारण बनेल. व्यापाराशी संबंधित लोकांना आठवड्याची सुरुवात फारशी चांगली नसेल, पण आठवड्याच्या अखेरीस काही अप्रत्यक्ष लाभ आनंदाचे कारण ठरतील. परीक्षा आणि स्पर्धेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. प्रेमसंबंधात गैरसमजांना चर्चेतून सोडवा. जोडीदाराच्या आरोग्याबद्दल मनात थोडी चिंता राहील.

 

भाग्यकारक रंग : करडा

भाग्यांक : 11

 

मिथुन – यशासाठी संघर्ष

मिथुन राशीच्या लोकांना या आठवडा संमिश्र राहील. आठवड्याच्या सुरुवातीला कामकाजात काही अडचणी येतील, पण आठवड्याच्या उत्तरार्धात परिस्थिती तुमच्या बाजूने होताना दिसेल. आठवड्याच्या सुरुवातीला व्यवसायाच्या दृष्टीने दूरचा किंवा जवळचा प्रवास होईल. प्रवासात प्रकृती आणि सामानावर लक्ष ठेवा. या काळात विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. स्वतःच्या क्षेत्राबाहेर काम करणारे, किंवा टार्गेटनुसार आणि कमिशन पद्धतीने काम करणाऱ्यांवर मानसित तणाव आणि अस्वस्थता राहील. तुम्हाला अपेक्षित यश मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. या काळात हंगामी आजारांबद्दल सावध राहावे लागेल. तुमची दैनंदिनी आणि खाण्यापिण्यावर विशेष लक्ष ठेवा. आठवड्याचा उत्तरार्ध आनंद आणि यश घेऊन येईल. या काळात एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने एखाद्या मोठ्या समस्येवर उपाय निघेल, त्यामुळे मन प्रसन्न राहील. प्रेमसंबंध दृढ होतील. आठवड्याच्या अखेरीस तुमचा जोडीदार तुम्हाला एखादी भेटवस्तू देईल. वैवाहिक जीवन सुखाचे राहील.

 

भाग्यकारक रंग : जांभळा

भाग्यांक अंक : 8

 

कर्क – वेळ वाया जाईल

कर्क राशीसाठी हा आठवडा संमिश्र राहील. या आठवड्यात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी वरिष्ठांचा सल्ला आवश्य घ्या. आठवड्याच्या सुरुवातीला होत असलेल्या कामात अडथळे आल्याने मन उदास होईल. नोकरदार लोकांच्या रोजगारांच्या साधनात काही अडचणी येतील, तर दुसरीकडे व्यापाऱ्यांना त्यांच्या स्पर्धकांकडून कडवे आव्हान मिळेल. आठवड्याच्या मध्यावर काम जास्त राहील. या काळात अनावश्यक गोष्टींवर धावपळ झाल्याने वेळ वाया जाईल. वाहन चालवताना सावध राहा, मार लागण्याची भीती आहे. नोकरदार महिलांना कार्यस्थळी आणि कुटुंबात संतुलन ठेवताना अडचणींना तोंड द्यावे लागेल. प्रेमसंबंधाच्या दृष्टीने हा आठवडा अनुकूल नाही. या आठवड्यात प्रेमसंबंधाचा दिखावा करणे, जगजाहिर करणे यापासून दूर राहा आणि प्रत्येक पाऊल विचारपूर्वकरीत्या उचला, अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी जोडीदाराला आवश्यक वेळ द्या.

 

भाग्यकारक रंग : राखाडी

भाग्यांक अंक : 15

 

सिंह – पदोन्नतीचे योग

सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्याचा आहे. नोकरदार लोकांसाठी आठवड्याची सुरुवात फार शुभ राहील, या काळात पदोन्नती आणि आर्थिक लाभाचे योग आहेत. उच्चाधिकाऱ्यांशी संपर्क वाढतील. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील आणि धनसंचय वाढेल. आठवड्याच्या मध्यावर एखाद्या नवीन कामाची योजना बनवाल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या माध्यमातून आनंद मिळेल. जमीन, घर यासंबंधी वादातील निर्णय तुमच्या बाजूने येतील. जर तुम्ही दीर्घकाळापासून जमीन किंवा संपत्ती विकत घेण्याचे नियोजन करत असाल या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या प्रभावी व्यक्तीच्या संपर्कात याल, ज्याच्या मदतीने आर्थिक लाभाचे मार्ग प्रशस्त होतील. राजकारणाशी संबंधित लोकांना उच्चपद मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील. प्रेमसंबंधाचे रूपांतर विवाहात होऊ शकतात. वैवाहिक जीवन सुखमय राहील. प्रकृती सामान्य राहील. घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या प्रकृतीमुळे चिंता वाढेल.

 

भाग्यकारक रंग : नारंगी

भाग्यांक : 1

 

कन्या – लोकांच्या बोलण्याकडे दुलर्क्ष करा

 

या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांन कार्यक्षेत्रात तुमच्या कामात सतत अडथळे आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून सावध राहिले पाहिजे. या आठवड्यात एखाद्या विषयात गुंतून पडण्यापेक्षा तुम्ही लोकांच्या बोलण्याकडे दुलर्क्ष करा. या आठवड्यात करिअर आणि व्यवसायाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. ज्या गोष्टी समजणार नाहीत, त्यात शुभचिंतकांचा सल्ला घ्या किंवा असे निर्णय टाळणे योग्य राहील. आठवड्याच्या उत्तरार्धात उत्पन्न कमी आणि खर्च अधिक होतील, त्यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते.

या काळात कामानिमित्त अनावश्यक धावपळ होऊ शकते. या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांची प्रकृती नाजुक राहील. हंगामी किंवा काही जुने आजार डोके वर काढतील, त्यामुळे त्रास होईल. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासात लागणार नाही. व्यापाऱ्यांनी नव्या योजनांत गुंतवणूक करताना फार सावध राहावे. अडचणीच्या काळात लव्ह पार्टनर आधार ठरेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील.

 

भाग्यकारक रंग : सोनेरी

भाग्यांक अंक : 2

 

तूळ – व्यापारात अपेक्षित लाभ

 

तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सुख आणि समृद्धीचा आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला करिअर आणि व्यवसायाशी संबंधित शुभवार्ता मिळणे सुरू होईल. जर तुम्ही दीर्घकाळापासून बदलीची वाट पाहात असाल तर या आठवड्यात तुमची इच्छापूर्ती होईल. आठवड्याच्या सुरुवातीला सुखसुविधांशी संबंधित वस्तूंची खरेदी झाल्याने घरी आनंदाचे वातावरण राहील. व्यापारात अपेक्षित नफा मिळाल्याने आनंदात वाढ होईल.

उत्पन्नाचे स्रोत वाढत असताना तुमचे खर्चही वाढतील पण हा पैसा शुभकार्यावर खर्च होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात शुभचिंतकाच्या मदतीने एखादे मोठे कार्य पूर्ण कराल. जोडीदाराच्या यशामुळे कुटुंबात आनंदाचे कारण ठरेल. प्रेमसंबंधात लव्ह पार्टनरसोबत जवळीक वाढेल. कुटुंबातील लोक प्रेमविवाहासाठी हिरवा झेंडा दाखवतील.

 

भाग्यकारक रंग : पांढरा

भाग्यांक : 5

 

वृश्चिक – नातेवाईकांशी मतभेद

 

वृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्याच्या पहिल्या टप्प्यात धन आणि सुखप्राप्ती होईल, पण तुमचा वेळ आणि पैसा वायफळ गोष्टींवर खर्च होईल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला प्रकृतीकडे विशेष लक्ष्य द्यावे लागेल. या कालावधित हंगामी आजारांच्या कचाट्यात सापडाल. अनावश्यक धावपळ आणि खर्चामुळे तुमचे मन थोडो उदास होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक कामात अडथळे उत्पन्न करण्याचा प्रयत्न करतील.

कुटुंबातील काही मुद्द्यांवरून नातेवाईकांशी मतभेद होतील. पण चर्चेच्या वेळी तुमच्याकडून वाईट भाषा वापरली जाणार नाही आणि वाईट व्यवहार होणार नाही, याकडे लक्ष द्या अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ येईल. आठवड्याच्या पहिल्या भागाच्या तुलनेत दुसऱ्या भागात जास्त दिलासा मिळेल. या काळात व्यापारांच्या संदर्भाने केलेला प्रवास इच्छित लाभ मिळवून देईल. एखाद्या मित्राच्या मदतीने नवीन कार्याची योजना बनवाल. परदेशात व्यापार करू इच्छिणाऱ्या लोकांच्या मार्गातील अडथळे दूर होतील. प्रेमसंबंधात भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका.

 

भाग्यकारक रंग : निळा

भाग्यांक : 12

 

धनू – धार्मिक, सामाजिक कामात योगदान

धनू राशीच्या लोकांना हा आठवडा संमिश्र जाईल. आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा ताण राहील. तुमचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त कष्ट आणि प्रयत्न करावे लागतील. या आठवड्यात फार धावपळ करूनही मनासारखे यश मिळणार नाही. आठवड्याच्या मध्यावर कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत एखाद्या विषयावरून मतभेद होऊ शकतात. पण या मतभेदांचे रूपांतर कोणत्याही कलहाचे कारण ठरणार नाही याकडे लक्ष द्या. आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या मित्राच्या मदतीने एखाद्या लाभदायक योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल. सत्ता किंवा सरकारशी संबंधित प्रलंबित कामांना गती येईल. या काळात धार्मिक आणि सामाजिक कामात तुमचे योगदान वाढेल. कडूगोड तक्रारी असतानाही प्रेमसंबंध चांगले राहतील, तसेच कठीण काळात लव्ह पार्टनर तुमची शक्ती बनले. आठवड्याच्या अखेरीस जोडीदारासोबत दीर्घ प्रवासावर जाल.

 

भाग्यकारक रंग : पिवळा

भाग्यांक अंक : 3

 

मकर – आळस सोडा, कामाला लागा

 

मकर राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक लाभ आणि प्रगतीच्या भरपूर संधी मिळतील, पण तुमचा आळस आणि बेजाबदारपणा यामुळे तुम्ही या संधी गमावण्याचीही शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ यांचे सहकार्य कमी मिळेल. त्यामुळे तुम्हाला आताची आणि भूतकाळातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त कष्ट आणि प्रयत्न करावे लागतील, अन्यथा ही कामे भविष्यात तुमच्या चिंतेचे कारण ठरतील. व्यापाराशी संबंधित लोकांना ही वेळ शुभ सिद्ध होईल. व्यापारात तुम्हाला मनासारखा लाभ मिळेल. या काळात समाजात तुमचा मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. घरी आईवडिलांचे पूर्ण सहकार्य आणि समर्थन मिळेल. या कालावधित रोजगाराच्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. घरी शुभकार्य संपन्न होईल. अविवाहित असलेल्यांचे विवाह ठरतील. जे सिंगल आहेत, त्यांच्या जीवनात कोणाचे तरी आगमन होईल. नुकतीच झालेली मैत्री प्रेमात बदलू शकते. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबद्दल चिंतेत असाल, अर्थात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे, खाण्यापिण्याकडेही लक्ष द्यायचे आहे.

 

भाग्यकार रंग : लाल

भाग्यांक अंक : 9

 

कुंभ – अडचणीच्या काळात मित्रांची मदत

 

कुंभ राशीच्या लोकांना आठवड्याची सुरुवात अडचणींची असेल, पण दिलासादायक गोष्ट अशी आहे की यावर मात करण्यासाठी तुमचे मित्र तुम्हाला मदत करतील. आठवड्याच्या सुरुवातीला करिअरच्या संदर्भात प्रवास करावा लागू शकतो. या काळात उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल, त्यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते.

पण ही कठीण वेळ जास्त काळासाठी असणार नाही, आठवड्याच्या उत्तरार्धात वेळ तुम्हाला अनुकूल होईल. आठवड्याच्या दुसऱ्या भागात सत्ता आणि सरकारशी सबंधित कामे एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून मोठा नफा होईल. व्यापाराशी संबंधित लोक बाजारातील तेजीचा लाभ उठवतील आणि बाजारात तुमची पत वाढेल. आठवड्याच्या अखेरीस चैनीच्या वस्तूंवर पैसे खर्च होतील. प्रेमसंबंधात दृढता येईल. लव्हपार्टनरच्या एखाद्या यशामुळे मन प्रसन्न होईल. कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण व्यतित करण्याची संधी मिळेल.

 

भाग्यकारक रंग : हिरवा

भाग्यांक : 7

 

मीन – प्रत्येक क्षेत्रात यश

 

मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आणि भाग्याचा आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमचे धाडस आणि पराक्रम याच्या जोरावर जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. या आठवड्यात करिअर आणि व्यापारात अपेक्षित प्रगती होताना दिसेल. तुम्हाला तुमच्या कार्यस्थळी वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन्हींची मदत मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल.

विदेशाशी संबंधित व्यापार असणाऱ्यांना हा आठवडा फार लाभदायक सिद्ध होईल. व्यापाराच्या दृष्टीने केलेला प्रवास धन आणि व्यापारात वृद्धी करणारा सिद्ध होईल. नोकरदार लोकांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन मिळेल. धनसंचयात वाढ होईल. कुटुंबात एखादे शुभकार्य संपन्न होईल. आठवड्याच्या अखेरीस पत्नीकडून किंवा संततीकडून शुभवार्ता मिळेल, ज्यामुळे घरी आनंदाचे वातावरण राहील. नोकरदार महिलांना ही वेळ फार शुभ सिद्ध होईल. घरी आणि कार्यस्थळी तुमचा मानसन्मान वाढेल. प्रेमसंबंध दृढ होतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. प्रकृती सामान्य असेल.

 

भाग्यकारक रंग : गुलाबी

भाग्यांक : 6

Leave a Comment