जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीत केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 7 March 2024) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
जन समर्थ लोन अर्ज आणि सबसिडी : सरकारकडून कर्ज आणि सबसिडी : Loan & Subcidy
मेष
नातेसंबंधासाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. घरात मन लागेल. घरच्या लोकांसोबत वेळ घालवाल. मित्रांसोबत फिरण्याचा प्लान कराल. मात्र, सहकाऱ्यांबाबत मनात शंका राहील. नवे मित्र जोडले जातील. कोर्ट कचेरीच्या कामात यश येईल. समस्या दूर होतील. मान सन्मान मिळेल. मित्र आणि नातेवाईकांमधील वितुष्ट दूर होईल. प्रवासाचा योग आहे. त्यामुळे थोडी दगदग वाढेल. पण एकूण आजचा दिवस आनंदी जाईल.
वृषभ
कुटुंबाला पुरेसा वेळ देण्यास असमर्थ ठराल. त्यामुळे मतभेद निर्माण होतील. विवाहीत पुरुषांचं मन भलतीकडेच लागेल. त्यामुळे प्रेम संबंधात कटुता येईल. कुटुंबात जीवनसाथीची साथ मिळेल. आनंददायी बातमी ऐकायला मिळेल. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील. आत्मसन्मान कायम राहील. जोखीम पत्करण्याचं धाडस करा. व्यवसायात फायदा होईल. पण गाफील राहू नका. नोकरदारांसाठी आजचा दिवस चांगला आहे.
गॅरेंटेड कर्ज : सिबिलची चिंता सोडा, खात्रीशीर 10 हजार ते 5 लाखापर्यंत Personal Loan
मिथुन
या राशींच्या लोकांनी आज भावनांवर ताबा ठेवावा. कापड व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरेल. कापड व्यापारी भविष्यातील प्लान समोर ठेवूनच गुंतवणूक करतील. व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरीत यश मिळेल. पण कर्मचाऱ्यांच्या कुरबुरी ऐकाव्या लागतील. सासूरवाडीतील लोकांशी चांगले संबंध होतील. भावंडांसोबत चाललेले वाद शांततेने मार्गी लागतील. तणाव आणि चिंतेमुळे अनिद्रेच्या तक्रारी उद्भवतील.
कर्क
घरात खर्च करताना बजेटवरही लक्ष ठेवा. अति आणि वायफळ खर्च टाळा. शेजाऱ्यांशी भांडण उकरून काढू नका. पती-पत्नीच्या नात्यात खटके उडतील. ब्लड प्रेशर आणि मधुमेहींनी काळजी घ्यावी. जुने आजार उद्भवतील. सासूरवाडीतून आर्थिक मदत मिळेल. प्रवासाचा योग संभवतो. तरुण आपलं लक्ष्य प्राप्त करण्यात यशस्वी होतील. महिलांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.
ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना : कागदपत्रे, अर्ज कसा करावा : Pension Scheme
सिंह
अनावश्यक योजना आखू नका. तुमचा खर्च विनाकारण वाढेल. त्यापेक्षा व्यवसायावर लक्ष द्या. आर्थिक प्रगतीचं नियोजन करा. पती-पत्नीच्या संबंधात सुधारणा होईल. मुलांचे शिक्षण आणि करिअरशी संबंधित गोष्टी मार्गी लागतील. कुटुंबात थोडी कुरबुर होईल. पण संध्याकाळपर्यंत वातावरण निवळेल. आरोग्य उत्तम राहील. प्रसन्नता वाटेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याचा हा दिवस आहे.
कन्या
प्रेमवीरांसाठी आजचा दिवस खास आहे. आज जीवनसाथीसोबत फिरायला जाण्याचा प्लान कराल. अर्थातच खिशाला फोडणी बसेल. हवामान बदलाचा आरोग्यावर परिणाम होईल. सर्दी, खोकला आणि ताप जाणवेल. तरुणांना मेहनतीचं फळ मिळण्याचा हा काळ आहे. अनुभवी आणि वरिष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल. झटपट यश मिळवण्यासाठी कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नका.
क्रेडिट कार्ड देण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल; RBIने कंपन्यांना दिल्या ‘या’ सूचना : credit card
तुळ
मुलांशी संबंधित गोष्टींमुळे त्रास होईल. त्यामुळे थोडी चिंता वाटू लागेल. बिझनेसमध्ये इतरांचा सल्ला ऐकून निर्णय घेऊ नका. घाट्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. रोजच्या कामापेक्षा आज काही तरी वेगळं शिकायला मिळेल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यात यशस्वी व्हाल. कोर्टकचेरीच्या गोष्टीत अडकून पडाल. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे, त्यामुळे संध्याकाळनंतर धांदल उडेल.
वृश्चिक
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असा असेल. अत्यंत जवळच्या व्यक्तीसोबत वाद होऊ शकतात. पती-पत्नीच्या नातेसंबंधात सुधारणा होईल. कोणतंही नवीन काम करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. तुमची मेहनत आणि प्रयत्न यशस्वी होतील. विवाह इच्छुकांना चांगली स्थळं येतील. आरोग्य उत्तम राहील, मन प्रसन्न राहील. संगीत क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना चांगली वार्ता ऐकायला मिळेल.
मोठी बातमी! निवडणुकांनंतर ७०,००० रुपयांपर्यंत वाढणार सोन्याचे भाव
धनु
विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यायला हवं, नाही तर नंतर पश्चात्ताप होईल. व्यस्तता असूनही कामातून वेळ काढाल. कुटुंबाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घ्याल. कर्ज घेण्याची वेळ येऊ देऊ नका. गेल्या काही दिवसांपासून कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या समस्या दूर होण्यास सुरुवात होईल. निर्णय घेताना विचार करूनच निर्णय घ्या. पूर्वीसारखी घोडचूक करू नका. संतान सुख मिळेल.
मकर
तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही लोकांना मदत कराल, त्यातून समाधान मिळेल. जवळच्या मित्राबाबत अप्रिय घटना ऐकायला मिळेल. नातेवाईकांशी निर्माण झालेला दुरावा आता दूर होईल. कुटुंबप्रमुख म्हणून आज महत्त्वाचे निर्णय घ्याल. तरुणांना मुलाखतीमध्ये यश येईल. कला क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस दुधात साखरेसारखा असेल. गुंतवणुकीकडे लक्ष द्या, भविष्यातील सुखाचा मार्ग मोकळा होईल.
Bitcoin ने तोडले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड! गुंतवणूकदार असे झाले मालामाल
कुंभ
एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडेल. उद्योग-नोकरीत परिस्थिती सामान्य राहील. कुटुंबासोबत सिनेमा किंवा नाटकाला जाण्याचा बेत आखला जाईल. जमीन खरेदीचे व्यवहार मार्गी लागतील. सामाजिक कार्यात भाग घ्याल. समाज क्षेत्रात मान सन्मान मिळेल. गरीबांना सढळ हस्ते मदत करा. शिक्षणात अडचणी असलेल्या मुलांना मदत कराल. प्रवास योग आहे. प्रवासाची दगदग झाल्याने प्रकृतीवर परिणाम होईल.
मीन
जवळच्या नातेवाईकाशी संबंधित वाईट बातमी कळेल. त्यामुळे विचलीत व्हाल. उद्योगात जोखीम पत्करू नका. पार्टनरसोबत डेटवर जाण्याचा योग आहे. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. वजनावर नियंत्रण ठेवा. पोटाशी संबंधित विकार उद्भवतील. अनेक प्रलंबित कामे मार्गी लागतील. गावाला जाण्याचा योग आहे. गावातील शेतीशी संबंधित अडचणी मार्गी लागतील. हवामान बदलाचा आरोग्यावर परिणाम होईल.