बुध देवाच्या कृपेने ‘या’ राशींना होणार धनप्राप्ती? जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य…

६ मार्च, बुधवार पंचांग : आज काही राशींना मुलांची चिंता वाटू शकते. तर, काहींनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. तुमच्या कुंडलीचे ग्रहमान कसे राहील, जाणून घ्या.

 

मेष:-झोपेची तक्रार जाणवेल. खर्च काही प्रमाणात वाढू शकतो. लहानशा पराजयाने निराश होऊ नका. इतरांवर आपली छाप पाडाल. लहानात लहान होऊन रमाल.

 

वृषभ:-स्वत:चा फायदा काढण्यात यशस्वी व्हाल. अधिकारांचे मार्गदर्शन मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यवहारी बुद्धिमत्ता वापराल. लेखकांच्या लिखाणाला गती येईल.

 

मिथुन:-मनातील इच्छा पूर्ण होईल. हातातील कामात यश येईल. दैनंदिन कमाई चांगली होईल. मोठ्या लोकांच्या ओळखी वाढतील. मुलांसाठी नवीन वस्तु खरेदी कराल.

 

कर्क:-कलेतून चांगले मानधन मिळेल. आपली पत सांभाळण्याचा प्रयत्न कराल. वडीलधार्‍यांचे मत विरोधी वाटू शकते. मानसिक ताणतणाव दूर करावा. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.

 

सिंह:-कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. प्रिय व्यक्तीशी मतभेद संभवतात. मुलांच्या वागण्याचा गांभीर्याने विचार करावा. गुरुकृपेचा लाभ होईल. चांगली संगत लाभेल.

Leave a Comment