ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या मार्गक्रमणामुळे मार्च महिना खूप खास असणार आहे. मार्चमध्ये अनेक मोठे ग्रह राशी बदलणार आहेत. राशी परिवर्तनासह या महिन्यात काही ग्रहांची युती देखील होणार आहे. शुक्र ग्रह ७ मार्चला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे, जिथे सूर्य आणि शनि ग्रह आधीपासून विराजमान आहे.
ज्यामुळे कुंभ राशीत शुक्र, सूर्य आणि शनिदेवाच्या युतीने ‘त्रिग्रही योग’ निर्माण होणार आहे. तीन ग्रह एकाच राशीत असताना त्रिग्रही योग तयार होतो. हा योग तब्बल ३० वर्षांनी कुंभ राशीत घडणार आहे. कुंभ राशीमध्ये तयार होणाऱ्या त्रिग्रही योगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होऊ शकतो, जाणून घेऊयात…
‘या’ राशीच्या लोकांना होणार बंपर धनलाभ?
वृषभ राशी
त्रिग्रही योग बनल्याने वृषभ राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होऊ शकतो. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये बरेच फायदे मिळण्याची शक्यता आहे. परदेशात नोकरीची संधी मिळू शकते. वडिलोपार्जित मालमत्ताच्या माध्यमातून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. आर्थिक स्थितीही मजबूत होण्याची शक्यता आहे. तुमचे धैर्य, सामर्थ्य आणि आत्मविश्वास देखील वाढण्याची शक्यता आहे.
मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग फायदेशीर ठरु शकतो. काही चांगली बातमी मिळू शकते. या काळात तुम्ही तुमच्या मेहनतीने भरपूर पैसे कमवू शकता. व्यावसायिकांना व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं. तुम्ही केलेल्या जवळपास सर्व योजना यशस्वी होऊ शकतात. बरेच दिवस रखडलेले काम आता या काळात पूर्ण होऊ शकते. नव्या मार्गातून पैशांची आवक वाढू शकते.
मकर राशी
त्रिग्रही योग बनल्याने मकर राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. बेरोजगारांना नवीन नोकरीच्या ऑफर देखील येऊ शकतात. व्यापार्यांना यावेळी चांगला नफा होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतूनही यावेळी फायदा होऊ शकतो. तसेच अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर यावेळी तुम्ही एखादे वाहन किंवा मालमत्ता इत्यादी खरेदी करू शकता.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)