१३ की, १४ मार्च, केव्हा सुरू होणार खरमास? ‘या’ दिवसापासून महिनाभर थांबतील सर्व शुभ कार्ये

हिंदु धर्मात खरमासला विशेष महत्त्व आहे. खरमास वर्षातून दोन वेळा येते एक डिसेंबर-जानेवरी आणि मार्च-एप्रिल महिन्याच्या आसपास. दरवर्षी मार्गशीर्ष आणि पौष महिन्यात खरमास येतो. खरसमाला मीनमास असेही म्हणतात. जेव्हा सूर्य धनु राशीत प्रवेश करतो, तेव्हा खरमास सुरू होतो. ज्योतिषांच्या मते, खरमासमध्ये विवाह, साखरपुडा, मुंडण आणि इमारत बांधणे यासारखी शुभ कार्ये निषिद्ध मानली जातात. यंदा खरमास केव्हा सुरु होणार आहे हे जाणून घेऊ या.

 

१४ मार्च ते १३ एप्रिल पर्यंत असेल खरमास

मार्चमध्ये जेव्हा सूर्य मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा खरमास सुरु होईल. यंदा खरमास १४ मार्चपासून सुरू होईल आणि १३ एप्रिल २०२४ रोजी संपेल. खरमास दरम्यान, कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, जसे की लग्न, गृह प्रवेश, मुंडन इ. हा काळ दान, जप, तपश्चर्या आणि देव भक्तीसाठी सर्वोत्तम मानला जातो.

खरमासबाबत प्रसिद्ध आहे एक पौराणिक कथा

एका पौराणिक कथेनुसार, आपल्या सात घोड्यांवर स्वार होऊन सूर्यदेव यांना संपूर्ण ब्रह्मांडाभोवती प्रदक्षिणा घालतात. पण प्रदक्षिणा सुरु झाल्यानंतर त्यांना कुठेही थांबण्याची परवानगी नव्हती. प्रदक्षिणा पूर्ण होण्यापूर्वी जर सुर्य देव थांबले तर संपूर्ण विश्वही थांबेल ज्यामुळे सर्वत्र हाहाकार माजेल.

प्रदिक्षणा सुरु झाल्यानंतर सुर्यदेवांच्या रथांचे घोडे विश्रांती न मिळाल्याने खूप थकतात. सुर्यादेवालाही त्यांची अवस्था पाहून दया येते पण तरीही ते रथ थांबवू शकत नव्हते. शेवटी ते एका तलावाजवळ घोड्यांना पाणी पिण्यासाठी घेऊन जातात, तिथे त्यांना दोन खर(गाढव) दिसतात. सुर्यदेव आपल्या रथाला दोन्ही गाढव जोडतात आणि प्रदक्षिणा सुरु ठेवतात.

दोन्ही खर प्रचंड मेहनत घेऊ रथ ओढतात पण त्यांच्यामुळे रथाचा वेग मात्र मंदावतो. सुर्यदेव एक महिन्याची प्रदक्षिणा पूर्ण करतात आणि त्यानंतर आपल्या घोड्यांना रथाला जोडीन उर्वरित परिक्रमा पुर्ण करतात. खर रथाला जोडून सुर्यदेव परिक्रमा करतात त्या काळाला खरमास म्हटले जाते.

खरमासात काय करावे आणि काय करू नये ?

हिंदू धर्मात खरमासाचा काळ अशुभ मानला जातो त्यामुळे खरमासात केवळ शुभ कार्य केली जात नाहीत. मकर संक्रांतीनंतर सूर्य उत्तरायण झाल्यानंतर जमीन, घर, वाहन आदी खरेदी असे शुभ कार्य केले जातात

खरमस म्हणजे सूर्यास्त. यावेळी, सूर्याची किरणे कमकुवत असतात आणि पृथ्वीवर त्याचा प्रभाव कमी असतो. हिंदू धर्मात काळ अशुभ मानला जातो खरमास काळात कोणतेही नवीन काम सुरू होत नाही. या काळात नवीन व्यवसाय किंवा काम करू नये.

खरमास दरम्यान विवाह, साखरपुडा, मुंडण, गृहप्रवेश इत्यादी करू नये. खरमासाच्या वेळी सून किंवा मुलीला निरोप देऊ नये. या काळात नवीन वाहन, घर, प्लॉट खरेदी करू नये.

आत्मचिंतन आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी हा काळ उत्तम मानला जातो. खरमासात संध्याकाळी दिवा लावा आणि तुळशीची पूजा करावी.

खरमासाच्या काळात निस्वार्थी दानाला खूप महत्त्व आहे. या महिन्यात तुम्ही कोणत्याही अपेक्षेशिवाय एखाद्याला दान करता तेव्हा तुम्हाला अक्षय पुण्य मिळते. लोकांना मदत केली पाहिजे असे मानले जाते.

खरमासाच्या काळात सूर्यदेवाची वेग मंदावते, सूर्याचा प्रभाव कमी असतो. अशा स्थितीत सूर्यदेवाला जल अर्पण केल्यास आणि त्यांच्या मंत्रांचा जप केल्यास त्यांच्या कृपेने सुख, समृद्धी आणि प्रगती येईल असेही मानतात.

(टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधरित आहे.)

Leave a Comment