३० वर्षांनी शनीच्या घरात विष्णु लक्ष्मी योग, ‘या’ राशी होतील गडगंज श्रीमंत; माघी गणेश जयंतीला मिळेल मोदकासारखी बातमी

 

ज्योतिषशास्त्रात विष्णू लक्ष्मी हा राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. हा राजयोग शुक्र व बुधाच्या युतीने तयार होत असून याला लक्ष्मी नारायण राजयोग सुद्धा म्हणतात. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा राजयोग असतो त्या व्यक्तीला राजासारखे आयुष्य जगता येते असं मानले जाते. या व्यक्तींच्या कुंडलीत स्वतः लक्ष्मी माता विराजमान असल्याने त्यांना धन- धान्य समृद्धीची कमतरता भासत नाही असेही सांगितले जाते. उद्या म्हणजेच १२ फेब्रुवारीला मकर राशीत शुक्राचा प्रवेश होणार आहे तर बुध ग्रह मकर राशीत अगोदरच विराजमान आहे. मकर ही शनीची रास मानली जाते. बुध व शुक्र हे दोन्ही धन- वैभवाचे कारक मानले जातात. बुध हा बुद्धीचा तर शुक्र हा प्रेमाचा ग्रह म्हणून सुद्धा ओळखला जातो. या दोन्ही ग्रहांच्या युतीने आता काही राशींच्या आयुष्यात प्रेम व धनाची वर्षा होणार आहे. गडगंज श्रीमंतीचा हा योग माघी गणेश जयंतीच्या एक दिवस आधी तयार होत असल्याने गणपती बाप्पा या राशींना मोदकासारखी गोड बातमी देणार आहेत असंच म्हणता येईल. या प्रभावित राशी कोणत्या, चला पाहूया.

माघी गणेश जयंतीला बनतोय ‘लक्ष्मी नारायण राजयोग’, ‘या’ राशींचे आयुष्य बदलणार
मेष रास (Aries Rashi Bhavishya)
हा राजयोग आपल्या राशीच्या कर्म भावी तयार होणार आहे. त्यामुळे आपल्या कर्माचे फळ या काळात मिळू शकते. कामाच्या ठिकाणी आपली प्रगती होण्याची चिन्हे दिसत आहेत. नोकरी व्यवसायात विशेष प्रगती कराल. तंत्रज्ञान आणि कला यांचा सुयोग्य संगम होईल. विवाहोत्सुक वर वधूंना मनाजोगता जोडीदार मिळण्यास ग्रहांचे पाठबळ मिळेल. विवाहित दाम्पत्यांना एकमेकांसाठी वेळ राखून ठेवावा लागेल. वडिलांसह नात्यात सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती व पगारवाढ होण्याची शक्यता आहे.

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)
लक्ष्मी नारायण राजयोग हा वृषभ राशीसाठी अनुकूल लाभ घेऊन येऊ शकतो. धार्मिक कार्यातील आपली आवड वाढू लागेल. वाडवडिलांच्या संपत्तीचा लाभ होऊ शकतो. भाग्य स्थानातील उच्चीचा मंगळ आपल्या कष्टाचे चीज करेल. शुक्र, राहूच्या सहकार्याने व्यावहारिक दृष्टीकोन ठेवाल. विद्यार्थ्यांना बुधाचे साहाय्य कामी येईल. आपले मुद्दे ठामपणे मांडाल, निर्धार सोडू नका. विवाहोत्सुक मुलामुलींनी थोडे सबुरीने घ्यावे. गुंतवणूकीतून लाभ होईल. घर, जमीन यासंबंधीची कामे हळूहळू मार्गी लागतील. प्रवासाची संधी मिळू शकते.मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)
मकर राशीच्या प्रथमच भावी लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहे. २०२३ पेक्षा २०२४ हे वर्ष एकूणच तुमच्यासाठी चांगले असेल त्यात या राजयोगाची जोडी लाभल्याने प्रचंड धनलाभ संभवतो. या वर्षी तुम्हाला नोकरी-व्यवसायात लाभ होईल. तसेच व्यवसाय चांगला चालेल. तेथे आर्थिक लाभ होईल. आपला आत्मविश्वास वाढल्याने अनेक कठीण वाटणाऱ्या गोष्टी पूर्णत्वास नेऊ शकता. भौतिक सुखाची सुरवात होईल. कुटुंबासह नाते सुधारण्याची चिन्हे आहेत. नोकरीसाठी सुरु असलेली धडपड शुभ परिणामांसह थांबेल

Leave a Comment