१०० वर्षांनी तिलकुंद चतुर्थीला चतुर्ग्रही योग; आजपासून ‘या’ राशींना अचानक लाभेल गणेश व लक्ष्मीकृपा, व्हाल धनाढ्य

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज १२ फेब्रुवारीला माघी गणेश जयंतीची तिथी सुरु होत आहे. संध्याकाळी ५ वाजून ४४ मिनिटांनी गणेश जयंती तिथीचा प्रारंभ होईल व १३ फेब्रुवारीच्या दुपारपर्यंत तिथी कायम असेल. उदयस्थितीनुसार १३ फेब्रुवारीला माघी गणेश जयंती व १२ फेब्रुवारीला तिलकुंद चतुर्थी साजरी होणार आहे. या शुभ तिथीवरच आणखी एक दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे.

शनीच्या स्वामित्वाची रास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मकर राशीत तब्बल १०० वर्षांनी चार ग्रह एकाच वेळी उपस्थित असणार आहेत. मकर राशीत सूर्य, बुध, मंगळ ग्रह अगोदरच भ्रमण करत आहेत तर आज १२ फेब्रुवारीला धन, वैभव, प्रेम व राजयोगांचा कारक शुक्र ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे. या चार ग्रहांच्या युतीसह चतुर्ग्रही योग तयार होत आहे. या मुळे प्रभावित राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. बाप्पाचा व लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळाल्याने या राशी बुद्धिशाली व धनाढ्य होऊ शकतात. या भाग्यवान राशींमध्ये तुमची रास आहे का हे पाहूया..

 

तिलकुंद चतुर्थीला चतुर्ग्रही योग बनल्याने ‘या’ राशींना मिळेल गोड बातमी

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

चतुर्ग्रही योग आपल्या राशीच्या लग्न भावात प्रथम स्थानी तयार होत असल्याने आपल्यासाठी हा योग सर्वाधिक प्रभावी असेल. या कालावधीत आपला आत्मविश्वास वाढीस लागेल. आरोग्याच्या जुन्या अडचणी दूर होतील. आजार व ताण- तणाव दूर झाल्याने अनेक गोष्टी तुमच्या मनासारख्या घडू लागतील. एक नवीन चैतन्य अनुभवता येईल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होऊ शकते याचा थेट प्रभाव तुमच्या पगारवाढीवर होऊ शकतो. विवाहित मंडळींच्या आयुष्यात गोडवा वाढू शकतो. भागीदारीच्या व्यवसायातून प्रचंड मोठा लाभ संभवतो.

 

तूळ रास (Libra Rashi Bhavishya)

चतुर्ग्रही राजयोग बनत असल्याने तूळ राशीचे अच्छे दिन सुरु होणार आहेत. या काळात तुमचे मनोबल वाढेल, तुम्ही घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून काम करू शकणार आहात. जुन्या गुंतवणुकीचा लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच वाडवडिलांच्या रूपातही आपल्याला धनलाभ होऊ शकतो. तुम्हाला भौतिक सुखाचे आकर्षण असेल, या काळात वाहन व प्रॉपर्टीसारखी मोठी गुंतवणूक करता येईल. लग्नाचे योग आहेत. मित्र मंडळींसह एखादा प्रवासाचा प्लॅन कराल. आर्थिक मिळकतीचे स्रोत अधिक सक्षम होऊ लागतील. मनात वाईट विचारांना थारा देऊ नका.

कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)

चतुर्ग्रही राजयोग हा आपल्या राशीच्या पंचम स्थानी तयार होत आहे. हा योग आपल्या राशीसाठी अनुकूल सिद्ध होऊ शकतो. आपल्याला संततीप्राप्तीचे योग आहेत. व्यासायिकांसाठी तर का कालावधी सोन्याहून पिवळी संधी घेऊन येणार आहे. नवनवीन लोकांशी जोडले जाल ज्याचा तुमच्या व्यवसायाला मोठा हातभार लागू शकतो. विद्यार्थी वर्गासाठी हा कालावधी लाभदायक असेल, एकाग्रता वाढू शकते. उच्च शिक्षणाच्या इच्छा पूर्ण होतील. जुनी देणी परत येतील ज्यामुळे अचानक धनलाभ संभवतो.

Leave a Comment