हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी, गणेश चतुर्थी या नावांनीही ओळखली जाते. यंदा १३ फेब्रुवारीला माघी गणेश जयंती साजरी होत आहे. या दिवशी श्रीगणेशाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि जीवनात सुख-समृद्धी टिकून राहते, असा विश्वास आहे. चला तर मग जाणून घेऊया माघी गणेश जयंतीचा शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजा पद्धती
गणेश जयंती २०२४ तारीख (Maghi Ganesh Jayanti 2024 Date)
हिंदू कॅलेंडरनुसार, या वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी १२ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी ५.४४ वाजता सुरू होत आहे. ही तारीख दुसऱ्या दिवशी १३ फेब्रुवारीला दुपारी २.१४ वाजता संपेल. उदय तिथीनुसार यावेळी गणेश जयंती १३ फेब्रुवारीला येत आहे.
गणेश जयंती २०२४ शुभ मुहूर्त (Maghi Ganpati 2024 Shubh Muhurat)
१३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.२९ ते दुपारी ०१.४२ वाजेपर्यंत आहे.
शुभ योग (Maghi Ganpati Shubhyog)
हिंदू कॅलेंडरनुसार यावेळी गणेश जयंतीला सर्वार्थ सिद्धीसह साध्या आणि सिद्ध योग तयार होत आहेत. यातील सर्वार्थ सिद्धी योग सकाळी ०७.०४ ते दुपारी १२.३५ पर्यंत आहे.
चंद्रोदय वेळ (Maghi Ganesh Jayanti Chandrodaya Time)
१२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५.४४ ते ८.५४ आणि १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.१८ ते रात्री १०.०४ पर्यंत.
गणेश जयंती का साजरी करतात? (Why do we celebrate Ganesh Jayanti?)
गणेश पुराणानुसार, माघ शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानण्यात येते. गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात. षोडशोपचार गणेशपूजन करून तिळमिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात.
कुंदफुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात, म्हणून या चतुर्थीला ‘तिलकुंद चतुर्थी’ असेही म्हणतात. या दिवशी ढुंढिराज गणेश रूपाची पूजा करावी असे सांगितले जाते. काही ठिकाणी गणेश चतुर्थीप्रमाणे दीड ते पाच दिवस गणेश जयंती साजरी करण्यात येते.