‘धनाचा दाता’ ग्रह मकर राशीत प्रवेश करून ७ मार्चपर्यंत ‘या राशींना देईल करोडपती बनण्याची संधी, प्रेमही बहरेल

प्रेम, वैभव, ऐश्वर्या, धन यांचा कारक मानला जाणारा शुक्र १२ फेब्रुवारीला मकर राशीत प्रवेश करणार आहे. असं म्हणतात जेव्हा एखादा ग्रह आपले स्थान बदलून अन्य राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची अन्य राशींच्या कुंडलीतील स्थिती सुद्धा बदलते. साहजिकच स्थान बदलल्यावर होणारा प्रभाव सुद्धा कमी- अधिक, शुभ-अशुभ स्वरूपात बदलत असतो. शुक्र हा प्रेमळ ग्रह म्हणून ओळखला जात असल्याने त्याची स्थिती राशींच्या आयुष्यातील नात्यांवर सुद्धा प्रभावी ठरू शकते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, तीन राशींच्या वैवहिक जीवन व प्रेम संबंधांवर येत्या १२ फेब्रुवारीपासून ते ७ मार्चपर्यंत शुक्राचा प्रभाव असू शकतो. तसेच मकर राशीतील शुक्राची स्थिती या राशींच्या आर्थिक बाजूवर सुद्धा प्रभावी ठरणार आहे. या मंडळींना खास व्यक्तीच्या रूपात ७ मार्चपर्यंत दोन्ही हातांनी पैसे गोळा करता येतील अशी चिन्हे दिसत आहेत. या तीन नशीबवान राशी कोणत्या व त्यांना कोणाच्या रूपात धनलाभ व प्रेम अनुभवता येणार हे पाहूया…

 

धनदाता शुक्र ‘या’ राशींना करेल कोट्याधीश? ७ मार्च पर्यंत होईल धनवर्षा

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

मेष राशीच्या गोचर कुंडलीत शुक्र देव दहाव्या स्थानी विराजमान असणार आहेत. या स्थितीत पुढील एक महिना मेष राशीसाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. नोकरदार मंडळींना प्रचंड मोठा धनलाभ संभवतो. आपल्याला कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची साथ लाभेल. वरिष्ठांच्या मदतीने आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. आपल्या कामाचे कौतुक होऊ शकते. व्यवसायात होणारी प्रगती वैयक्तिक आयुष्यात सुद्धा अनेक इच्छा पूर्ण करण्यासाठी योगदान देऊ शकते. तुमची पार्टनरसह एखादी छान पिकनिक होऊ शकते ज्यामुळे नात्यात आलेला दुरावा दूर होऊ शकतो.

 

कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र गोचर आपल्या राशीच्या सातव्या स्थानी होणार आहे. याचा प्रभाव आपल्या प्रेम संबंधांवर होऊ शकतो. वैवाहिक आयुष्यातील गोडवा वाढेल. दोघांच्या नात्यामध्ये गुंतागुंत होत असल्यास तिसऱ्या व्यक्तीचा सल्ला घेणे टाळावे. संभाषण अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकते हे लक्षात ठेवावे लागेल. समाजात मान सन्मान वाढीस लागून नव्या ओळखी होऊ शकतात. आयुष्यात नव्या व जुन्या दोन्ही नात्यांमधून लाभ संभवतो. आई वडिलांच्या रूपात आर्थिक बाजूला पाठबळ मिळेल.

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र देव हे मकर राशीच्या लग्न भावी विराजमान झाले आहेत. यामुळे आपल्या राशीला प्रचंड लाभ संभवतो. कौटुंबिक आयुष्य सुधारू शकते. नात्यांमधील गैरसमज दूर होतील. संतती सुख लाभू शकते. गुंतवणूकदारांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. हाडे, सांधे आणि फुप्फुसे यांचे आरोग्य जपावे. नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतील. अनुभवातून खूप शिकाल.

Leave a Comment