मांसाहार केल्यावर स्वामींची पूजा, देवपूजा करावी की नाही ? नामस्मरण करावे की नाही? वाचा महत्वाची माहिती

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्र-मैत्रिणींनो, आपल्यापैकी बर्‍याच जणांना असा प्रश्न पडतो. की मांसाहार केल्यानंतर स्वामींची सेवा करावी. की नाही त्याच बरोबर इतर देवदेवतांची देखील सेवा करावी की नाही. हा मोठा प्रश्न प्रत्येकाच्या समोर येऊन उभा राहतो. असा प्रश्न देखील पडतो. की ते स्वतः मांसाहार करत नाही पण त्यांचे घरचे करतात. त्यावेळी स्वामी समर्थ सेवा करायला चालते का अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहे.

 

असे खुप प्रश्न मनामध्ये गोंधळ घालत असताना आपण ज्यावेळी देव पूजा करतो. किंवा देवांची सेवा करतो त्यावेळी आपले मन ही सेवा करत असताना लागत नाही. आपल्या सर्वांना स्वामी सेवा मनापासून करावीशी वाटत असते, पण मांसाहार केल्यानंतर स्वामींची पूजा करावी की न करावी अशी शंका मनामध्ये येते. परंतु ज्यावेळी आपण शुद्ध शाकाहारी जेवण जेवतो. त्यावेळी आपल्या मनामध्ये असले कोणतीही शंका येत नाही.

 

ज्या वेळी आपण मांसाहार जेवण ज्योती त्यावेळी आपण स्वतःला मानसिक दृष्ट्या अयोग्य समजतो. त्या वेळी स्वामींची सेवा किंवा देवपूजा करणे, कधीही अयोग्य असते.

ज्यावेळी आपल्या घरामध्ये मांसाहार जेवण बनवले जाते. त्यावेळी घरातील वातावरण बदलते. त्याकडे लक्षपूर्वक पाहिले तर आपल्या लक्षात येईल की त्यादिवशी घरामध्ये वाद होतील, घरातील वातावरणात अशांततेचे निर्माण होते.

 

मांसाहार हा स्वामी सेवेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. यावर उपाय काय करायचा तर ज्या वेळी आपण मांसाहार करतो. त्या वेळी स्वामी सेवा किंवा अन्य दैवतांची सेवा करायचीच नाही. ज्यावेळी आपण मांसाहार करतो, त्यावेळी सेवा करायचीच नाही. असे समजावे की तो एक दिवस आपण सेवा केली नाही. आणि स्वामी सेवे विना आपल्याला त्यादिवशी राहायचे आहे.

 

गुरुचरित्र मध्ये असे लिहिले आहे की ज्या दिवशी पुण्य घडले नाही.” तो दिवस गेला पायी तया यमाशी करुणा नाही करावे पुण्य तात्काळ” या वाक्याचा अर्थ असा की ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही. तो दिवस वाया गेला असे समजावे हे सगळे आपल्या मनाचे विचार झाले. अशा वेळी आपण आपल्या मनाला प्रश्न करायचा, मी मांसाहार केल्यानंतर स्वामींची पूजा केली स्वामींना चालेल का? या प्रश्नाचे उत्तर स्वतः शोधण्याचा प्रयत्न करा.

 

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रच केलेली आहे. याचा कोणी अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

 

अशा प्रकारच्या नवनवीन लेखन ची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment