तब्बल १० वर्षांनी कुंभ राशीमध्ये शुक्र आणि सुर्य ग्रहाची होणार युती; ‘या’ राशींच्या व्यक्तींना मिळेल भरपूर पैसा

ज्योतिष शास्त्रानुसार १३ फेब्रुवारीला ग्रहांचा राजा सूर्य देव कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. ७ मार्च रोजी धनाचा दाता शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल. त्यामुळे कुंभ राशीमध्ये शुक्र आणि सूर्याची युती तयार होत आहे. अशा स्थितीत हा प्रभाव सर्व राशींवर राहील. पण अशा ३ राशी आहेत ज्यांची संपत्ती यावेळी वाढू शकते. तसेच सूर्य आणि शुक्राच्या आशीर्वादाने प्रत्येक कामात यश मिळू शकते. चला जाणून घेऊ या कोणत्या आहे या राशी

मकर

शुक्र आणि सुर्याची युती मकर राशीच्या व्यक्तीसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण ही युती मकर राशीतून धन आणि वाणीच्या घरात तयार होणार आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो.

तसेच तुमच्या संभाषण कौशल्याचा(वाणीचा) प्रभाव दिसेल, ज्यामुळे लोक प्रभावित होतील. त्याच वेळी, नोकरदार लोकांना नवीन संधी मिळतील आणि उत्पन्नाचे इतर स्त्रोत देखील मिळतील, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच यावेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे.

तुळ

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शुक्राची युती शुभ ठरू शकते. कारण ही युती तुमच्या गोचर कुंडलीचे पाचव्या घरात होणार आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही अनेक प्रभावशाली लोकांनाही भेटाल आणि प्रत्येक जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल.

ग्रहांच्या शुभ युतीगामुळे तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, जर तुमचे प्रेमसंबंध चालू असतील तर तुम्हाला त्यात यश मिळू शकते. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही कोणत्याही उच्च संस्थेत प्रवेश घेऊ शकता.

वृश्चिक

सूर्य आणि शुक्राची युती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. कारण ही युती तुमच्या राशीच्या चौथ्या घरात होणार आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला भौतिक सुख मिळेल. तसेच सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. यावेळी तुम्ही कोणतेही वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकता.

दुसरीकडे, जर तुम्ही रिअल इस्टेट, मालमत्ता, वैद्यकीय आणि हॉटेलशी संबंधित काम करत असाल तर तुम्हाला यावेळी चांगला नफा मिळू शकेल. यावेळी, तुमच्या आईशी तुमचे संबंध चांगले राहतील. आईच्या मदतीने धनलाभ होऊ शकतो.

Leave a Comment