मीत्रांनो, सकाळी लवकर उठल्यानंतर घरातील स्त्रियांनी काय करावे म्हणजे घरात देवी लक्ष्मीचा वास होऊन घरात सुख समृद्धी येईल….? मित्रांनो घराचे मुख्य प्रवेशद्वार हे इतरांपेक्षा भव्य मोठी असावे. मुख्य प्रवेशद्वाराजवळ कचरा अडगळीचे साहित्य ठेवू नये.
महिलांनी रात्री झोपताना एका तांब्यात पाणी भरून ठेवावे आणि सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यावर एक तांब्याभर पाणी मुख्य दाराच्या उंबरठ्यावर थोडेथोडे शिंपडावे. मित्रांनो परंतु उंबरठ्यावर मारायचे पाणी हे रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले असावे. त्यामुळे रात्रभर उंबरठ्यावर जमलेली नकारात्मकता दार उघडल्याबरोबर घरात प्रवेश करणार नाही.
रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यामुळे उंबरठ्यावरील नकारात्मक शक्ती तेथल्या तिथं नष्ट होते आणि घरात प्रवेश करू शकणार नाही. नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू न शकल्यामुळे आपल्या घरावर वाईट शक्तीचा प्रभाव पडू शकत नाही महिलांनी सकाळी उठल्यावर हे एक काम न कंटाळता रोज जरूर करावे.
मित्रानो आपल्यावर जर कोणी काळी जादू केली असेल करणी केली असेल तर शनिवारी व रविवारी अंगणात दोन तांबे पाणी शिंपडून अंगण स्वच्छ झाडून काढावे.
मित्रांनो यामुळे आपल्यावर जर कोणी काळी जादू केली असेल करणी केली असेल तर त्याचा आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही उलट ज्यांनी करणी केली असेल त्याच्याकडे ती परत जाईल. मित्रांनो अंगण जर रोज झाडत असाल तर काही प्रश्नच नाही पण ज्यांना रोज अंगण झाडणे शक्य नाही त्यांनी किमान शनिवारी व रविवारी अंगण वर सांगितल्या प्रमाणे झाडावे.
घरातील लादी किंवा फरशी पुसताना त्या पाण्यात एक मुठ मीठ टाकावे आणि त्या पाण्याने फरशी पुसावी यामुळे ही घरातील नकारात्मक शक्ती निघून जाते. तसेच मित्रांनो मिठाच्या पाण्याने फरशी बसल्याने माझ्या मुंग्या घरात येत नाहीत.
मित्रांनो प्रत्येक सोमवारी आंब्याच्या पानांचे तोरण मुख्य दाराला बांधावे. पुढचा सोमवार येईपर्यंत ते तोरण तसेच ठेवावे म्हणजे तोरण आठवडाभर बांधावे. पुढील सोमवारी जुने तोरण काढून टाकावे व नवीन तोरण बांधावे. यामुळे घरातील सर्व सदस्यांचे स्वास्थ चांगले राहते घरात कोणी वरचेवर आजारी पडत असेल तर तेही बंद पडते.
मित्रांनो धनप्राप्तीची इच्छा असेल तर बुधवारी अशोकाच्या झाडाचे तोरण बांधावे व हे तोरणही आठवडाभर राहू द्यावे व दुसर्या बुधवारी जुने तोरण काढून नवीन तोरण बांधावे. मित्रांनो यामुळे घरी कधीही धनाची कमतरता भासणार नाही लक्ष्मी आपल्या घरी नेहमी वाचत करेल त्यामुळे घरात सुख-शांती राहील.
मित्रांनो घरात सगळीकडे कोठेही देवदेवतांचे फोटो किंवा मूर्ती ठेऊ नयेत कारण देव काही शोभेची वस्तू नाही. जर देवी-देवतांचे फोटो किंवा मूर्ती आपण शोकेसमध्ये ठेवले तर तेही आपली शोभा करून टाकतात म्हणून देव-देवतांना देवघरातच ठेवावेत. इतर ठिकाणी कुठेही ठेवू नयेत.
मित्रांनो देव घरात ठेवलेल्या देवी-देवतांच्या मूर्ती चे फोटोचे रोज पूजन होते तसे घरात इतररत्र ठेवलेल्या फोटो किंवा मूर्तीचे पूजन होत नाही आणि हे पूर्णपणे चुकीचे आहे. हॅप आपल्याकडून होऊ नये म्हणून आपण देवी-देवतांचे मूर्ती किंवा फोटो शोकेस मध्ये ठेवू नयेत कुठेही बाहेर फिरायला गेलो तर देव देवतांचे फोटो आणू नयेत कारण शोकेस मध्ये ठेवून आपण अपमानच करत असतो
मित्रानो तसेच हे हिंस्र प्राणी, बुडणारे जहाज, युद्धाचे फोटो, नटराजाची मूर्ती, ताजमहाल या गोष्टी घरात ठेवू नयेत. यामुळे घरातील शांतता भंग पावते घरात कुरबुरी वाढतात भांडण-तंटे होतात. मित्रांनो वाहत्या पाण्याचाही फोटो किंवा पेंटिंग घरात असू नये त्यामुळे पैसा पाण्यासारखा वाहून जातो.
मित्रांनो मुख्य दाराच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक जरूर काढावे. यासाठी राईच्या तेलात कुंकू टाकून मिश्रण करावे व या मिश्रणाने स्वस्तिक काढावे. स्वस्तीकच्या दोन्ही बाजूला दोन रेषा काढाव्यात यामुळे आपल्या घरात देवी लक्ष्मी टिकून राहील. मित्रांनो यासाठी थोडेसे तांदूळ अर्धा तास भिजत घालावेत. अर्ध्या तासाने तांदूळ व त्यामध्ये थोडीशी हळद घालून मिक्सरला फिरवून पेस्ट करावी. या पेस्टने आपल्या तुळशीजवळ ओम हे अक्षर लिहावे यामुळे घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही
मित्रांनो आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुळस जरूर लावावे यामुळे घरात सुख शांती राहते व नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही. मित्रांनो घरात मनी प्लांट असेल तर अति उत्तम यामुळे घरी लक्ष्मी स्थिर राहते. मनी प्लांट लावताना ते कुंडीत लावावे व घराच्या दक्षिण बाजूला ठेवावे. अंगणात जागा असेल तर रूईचे आणि मंदार चे झाड जरूर लावावे. यामुळे शत्रुभय निघून जाते.
मित्रांनो घरात तीन मोराची पिसे जरूर लावावीत. घरात प्रवेश करताना समोरची भिंत असते त्यावर तीनमोरपीस जरूर लावावीत त्यामुळे वास्तुदोष असेल तर तो निघून जातो. मित्रांनो आपल्या डायनिंग टेबल जवळ किंवा घरात आपण जिथे जेवतो तिथे एक मोरपीस भिंतीवर जरूर लावावे त्यामुळे घरात सुख-समृद्धी येते.
वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.