धार्मिक रुढी-नियमांनुसार, देवावा नैवेद्य अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. भाविकांनी खऱ्या भक्ती-भावाने देवाच्या मूर्तीला अर्पण केलेला नैवैद्य देवाला मान्य होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
हिंदू धर्मात उपासनेला नेहमीच महत्त्व आहे. पूजा करताना अनेक गोष्टी काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. देवाला अर्पण केल्या जाणाऱ्या नैवेद्याविषयी सांगितले जाते की, नैवेद्य ताजा, स्वच्छ पद्धतीनं बनवलेला असावा. याशिवाय नैवेद्याशी संबंधित अनेक गोष्टी आणि नियम आहेत, जे लक्षात ठेवायला हवेत.
नैवेद्यासाठी वापरणारं भांडे/पात्र – देवाला अर्पण केला जाणारा नैवेद्य कोणत्या पात्रात दिला जात आहे, हे देखील महत्त्वाचे आहे. नैवेद्य अर्पण करण्याचे भांडे सोने, माती किंवा पितळ धातूचे असेल तर ते खूप शुभ मानले जाते. याशिवाय केळी किंवा सुपारीच्या पानात नैवेद्य अर्पण करण्याचा विशेष फायदा आहे.
नैवेद्य कधी तयार करायचा – पूजेच्या काही तास आधी नैवेद्य तयार करावा. म्हणजे नैवेद्य जेवढा ताजा असेल, तेवढा चांगला मानला जातो. नैवेद्य फार काळ अगोदर तयार केलेला नसावा. मात्र, काही ठिकाणी शीतला मातेच्या पूजेमध्ये शिळा नैवेद्य वापरला जातो आणि पूजेच्या एक रात्री आधी नैवेद्य तयार केला जातो.या व्यतिरिक्त, इतर सर्व पूजांमध्ये ताजा नैवेद्य अर्पण करण्याचा सल्ला दिला जातो.
नैवेद्य कधी परत घ्यावा – नैवेद्य अर्पण केल्यानंतर देवासमोर जास्त वेळ ठेवणे चांगले मानले जात नाही. पूजेच्या ठिकाणाहून नैवेद्य काढण्याचीही ठराविक वेळ असते.
नैवेद्य अर्पण केल्यावर नंतर काही वेळाने देव्हाऱ्यातून काढावा. नंतर झाकून स्वच्छ ठिकाणी ठेवावा किंवा इतर भक्तांना प्रसाद वाटावा.
नैवेद्य कसा असावा – कोणताही नैवेद्य शुद्ध मानला जात असला तरी प्रत्येक देवतेचा आवडता नैवेद्य वेगळा मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, देवी-देवतांन आवडणारे पदार्थ नैवेद्यामध्येअर्पण केल्यास देव प्रसन्न होतात.
यामुळे उपासना सफल मानली जाते आणि उपासनेचे चांगले फळ प्राप्त होते, असे मानले जाते.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.