नामस्मरण व पूजा करताना मनात वाईट विचार का येतात ? 

 

 

नमस्कार मित्र- मैत्रिणींनो,

 

मित्र- मैत्रिणींनो, आपल्यातील बऱ्याच व्यक्तींना असे घडते की ज्या वेळी आपण देवाचे नामस्मरण करतो, त्यांची प्रार्थना करतो, त्यावेळी मनामध्ये वेगवेगळे विचार येत असतात. व आपण आपल्या त्या विचारांवर ताबा ठेवू शकत नाही. असे काय होत असते याचे प्रश्न सर्वांनाच पडत असते.

 

ज्या व्यक्ती आपल्या मनाला ताब्यात ठेवू शकत नाही. अशा स्वामी भक्तांसाठी स्वतः स्वामी समर्थ महाराज असे सांगतात. की हे पटवून सांगण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांनी एक उदाहरण दिले आहे हे उदाहरण पुढीलप्रमाणे.

 

स्वामी समर्थ जवळ एक स्वामीभक्त येतो व तो स्वामींना म्हणतो की स्वामी समर्थ महाराज मी ज्यावेळी प्रार्थना करतो, नामस्मरण करतो, जप करतो त्यावेळी माझे मनात वेगवेगळे वाईट विचार येत असतात. त्या विचारांना मी थांबू शकत नाही असे का होत असेल.

 

या प्रश्नावर स्वामी समर्थ महाराज त्या भक्ताला सांगतात की आपल्याला तर माहीतच आहे. स्वामी समर्थ महाराज हे अंतर्ज्ञानी आहेत. त्यांच्यापासून कुठलीही गोष्ट लपलेली नाही. इथपर्यंत की आपल्या मनामध्ये काय चालू आहे

हे आपल्या पेक्षा जास्त आपल्या स्वामी समर्थ महाराजांना माहित असतं.

 

त्यावेळी स्वामी समर्थ महाराज त्या भक्ताला विचारतात की तुला दोन घर आहेत. ना तर तो म्हणतो हो एका घरात मी राहतो.

 

आणि एक घर भाड्याने दिला आहे. भाड्याने दिलेल्या खोलीतील भाडेकरूला जर तू लगेच सांगितला की तू आज खोली खाली कर तो मनुष्य लगेच खुली खाली करू शकेल का?

 

ती व्यक्ती लगेच खोली खाली करू शकणार नाही. ह्या गोष्टीला तू विरोध करणार आरडाओरडा करणार जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न करणारच ना. व न खाली करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत राहणार त्याचप्रमाणे देवपूजा करताना देखील असंच असतं.

 

इतके दिवस आपल्या मनामध्ये वाईट विचारांची जगभर आहे ते वाईट विचारांचे घर सहजासहजी रिकामे होणार नाहीत व चांगले कार्य करत असताना हे आपल्याला अडथळे निर्माण करत राहणारच आहेत.

 

त्यामुळे ते आपल्याला देवपूजा करताना किंवा नामस्मरण करताना अडथळे अशा प्रकारे निर्माण करतच राहणार. अशा शब्दात स्वामी समर्थ महाराजांनी त्या स्वामी भक्ताला समजावून सांगितले.

 

या पद्धतीनेच जर आपण नामस्मरण प्रार्थना पूजा वगैरे आपण करतो. हळू हळू हे नकारात्मक गोष्टी व विचार ते नाहीशी होत असतात त्या बाहेर पडायला लागतात. व आपले मन स्वच्छ होण्यास मदत होते. व आपण देवाच्या सानिध्यात तल्लीन होण्यास सुरुवात.

 

ज्या वेळी आपण देवाचे नामस्मरण, प्रार्थना करतो. त्यावेळी आपल्याला देखील असे मनात वाईट विचार येत असतील. तर काही काळजी करायचे काम नाही.

 

ज्या वेळी आपण नामस्मरण प्रार्थना करत असतो. त्या वेळी जर असे वाईट विचार मनात येत असतील तर दुप्पट जोमाने देवाचे नामस्मरण व पूजा करावी.

 

आपल्या मनामध्ये कितीही वाईट विचार आले तरी नामस्मरणामधे काही खंड पडू न देता सदैव नामस्मरण करत राहावे. त्यांनी हळूहळू मनातील नकारात्मक विचार कमी होऊन आपल्याला सकारात्मक विचार येण्यास सुरुवात होईल. व वाईट विचारांपासून आपली निश्चितच सुटका होऊन जाईल.

 

मित्रांनो हि माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

 

अशाच प्रकारचे नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment