श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा कशी करावी?

 

 

मित्रांनो आपण सर्वजण स्वामींची भक्त आहोत कारण आपल्याला कोणत्याही संकटामध्ये स्वामी कधीही एकटे सोडत नाहीत आणि आपली त्याच बरोबर स्वामींवर खूप श्रद्धा आहे कारण आपण एखादी गोष्ट जर स्वामींकडं मागितली तर ती आपली इच्छा लगेच पूर्ण होते आपण स्वामींना प्रसन्न करण्यासाठी अनेक वेगळे प्रकारचे उपाय करत असतो त्याचबरोबर त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण त्यांची पूजा मनोभावे श्रद्धेने करत असतो प्रत्येक भक्ताला स्वामींची कोणता तरी एक अनुभव आलेला आहे असा अनुभव जर तुम्हालाही यावसं वाटत असेल तर तुम्ही स्वामींची नित्य सेवा करायची आहे ती नित्यसेवा कशी करायची आहे चला तर मग आता पण जाणून घेऊया.

 

मित्रांनो स्वामींची नित्यसेवा आपल्याला जर करायचे असेल तर स्वामींची प्रतिमा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये असणे आवश्यक आहे आणि स्वामींची मूर्ती किंवा फोटो गुरुवारी देवघरांमध्ये बरोबर मध्यभागी स्थापन करायचे आहे स्वामींना त्यांचे आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे व त्याचबरोबर गोडाचे जेवण देखील करायचे आहे. पंचोपचार पूजा करून सकाळची आपल्याला आरती करायची आहे रोज आपल्याला नित्य पंचोपचार पूजा करून दूध साखरेचा नैवेद्य आपल्याला रोज स्वामींना दाखवायचा आहे हा नैवेद्य दाखवल्यावर स्वामी खुश होतात असे देखील म्हटले जाते

 

घरात नैवेद्य करण्यासाठी कोणतेही कडक नियम नाहीत पण घरामध्ये कोणी जेवायच्या अगोदर स्वामींना नैवेद्य दाखवणे हे खूप आवश्यक आहे. तुम्ही किंवा तुम्ही बाजूला काढून ठेवला तरी देखील चालू शकते पंचोपचार पूजा झाल्यानंतर ना आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे बरोबर घरातल्या प्रत्येक व्यक्तीने अकरा माळी श्री स्वामी समर्थांचा जप देखील करायचा आहे असे केल्याने स्वामी लवकरच तुमच्यावर प्रसन्न होतात जर तुम्हाला 11 माळी रोज जप करत जमत नसेल तर नित्य नियमाने तुम्ही रोज एक माळ जप केला तरी देखील चालू शकते काही जणांकडे जपमाळ देखील नसते त्या व्यक्तीने 21 मिनिटं जप करा व त्यानंतर न श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथाचे तीन अध्याय वाचन करायचे आहे जर तुम्हाला सकाळी वेळ मिळत नसेल तर दिवसभरात तुम्ही कधीही ते अध्याय वाचन करू शकता मात्र याच्यामध्ये कधीही खंड पडू देऊ नका.

 

श्री स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवताना अनामिका बोटाने पाण्याचा भरीव चौकोन करून त्याच्यावर नैवेद्याचं ताट ठेवायचे आहे आणि त्याचबरोबर नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर व नैवेद्य दाखवून झाल्यानंतर स्वामींना मुजरा करायला विसरायचा नाही दररोज आपण सकाळी व संध्याकाळी स्वामींना नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवायचे नाही जर रात्री माझे जेवण केले नसल्यास स्वामीं पूर्त आपल्याला भात करून दूध भाताचा नैवेद्य आपल्याला स्वामींना दाखवायचा आहे किंवा दूध साखर पुरी याचा देखील नैवेद्य दाखवला तरी चालतो नैवेद्य दाखवताना देवघरांमध्ये निरांजन जळत असावे किंवा एक अगरबत्ती लावला तरी देखील चालतो असं म्हटलं जातं की महाराज किंवा आणखी कोणते देव अग्नी शिवाय जेवण करत नाहीत.

 

अशाप्रकारे जर तुम्ही दररोज स्वामींची पूजा केल्यास तुमच्यावर स्वामी लवकरच प्रसन्न होणार आहेत व त्याचबरोबर तुम्हाला रोज वेळ असेल तर तुम्ही स्वामींचे पारायण देखील करायचे आहे असं म्हटलं जातं की अशी सेवा आपल्याला मठातून देखील मिळते व तीच श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा असते जर तुम्हाला मठात जायला होत नसेल तर तुम्ही याच प्रकारे रोज घरामध्ये नित्यसेवा करायची आहे याच्यामुळे तुमच्यावर स्वामी लवकर प्रसन्न होणार आहेत व तुमच्या काही इच्छा असतील तर इच्छा देखील पूर्ण होणार आहे.

Leave a Comment