घरात नवस कसा बोलावा? नवस कसा करावा? : नवस नक्की करा इच्छा पूर्ण होतील : श्री स्वामी समर्थ 

 

मित्रांनो नवस बोलतात आणि नवस बोलून झाल्यानंतर जेव्हा तो नवस पूर्ण होतो म्हणजे जी मनातली इच्छा असते ती पूर्ण होते तेव्हा तो नवस फेडायचा असतो पूर्ण करायचा असतो.

नवस म्हणजे काहीतरी करण्याची इच्छा देवा मला हे दे ते दे इच्छा पूर्ण झाली तर मी हे करेन ते करेन असं काहीतरी असतं. तर हा नवस मंदिरात जाऊन म्हणजे जो देव प्रसन्न होतो त्याच्या समोर जाऊन हा नवस करायचा असतो. तो आपल्या कुलदेवते समोर करायचा असतो परंतु मित्रांनो तुम्हाला घरात सुद्धा असा नवस करता येतो.

तर तोच प्रश्न आहे की घरात नवस कसा बोलावा आणि तो नवस घरात पूर्ण कसा करायचा ? तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील. तर मित्रांनो तुम्हाला ही तुमची कोणती इच्छा पूर्ण करायची असेल किंवा काहीतरी मागायचे असेल किंवा नवस करायचा असेल तो नवस तुम्हाला घरीच बोलायच असेल तर तुम्ही सोप्या रीतीने तुम्ही बोलू शकता.

मंदिर आपल्या घरीच असते, देवता आपल्या घरीच असतात म्हणून आपण देव पूजा करतो. देवाला देव देव करतो. सेवा करतो भक्ती करतो. तर तुम्हाला नवस बोलण्यासाठी फक्त एक गोष्ट लागणार आहे ती गोष्ट म्हणजे पूजेचा संपूर्ण नारळ.

मित्रांनो, संपूर्ण नारळ म्हणजे जेव्हा आपण नारळ फोडतो तेव्हा नारळ आपण सोलून घेतो आणि मग तो फोडतो. तुम्हाला नारळ सोलायचा नाही जसा आला तसा तो नारळ देवघरात ठेवायचा आहे आणि तुम्ही स्वतः नवस बोलायचा आहे देवघरात बसायच आहे.

त्यानंतर देवांना नमस्कार करायचा दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि जो नारळ तुम्ही आणला आहे तो नारळ तुमच्या दोन्ही हातात ठेवायचा आहे आणि डोळे बंद करून तुम्हाला जे हवं जे बोलायचं आहे.

 

जे मागायचं आहे जो नवस बोलायचा आहे. ते बोलायचं मला हे पाहिजे मला ते पाहिजे माझ्या संकट समस्या आली आहे ते दूर करा. जी तुमची संकट, तुमच्या इच्छा असतील ते सगळं तुम्हाला बोलायचं आहे.

 

हे सगळं बोलून झाल्यानंतर तुम्ही नवस पुर्ण झाल्यावर काय करू शकता तर मी तुमच्या दर्शनाला येईल मी हे पूर्ण करेल मी अकरा बालकांना किंवा बालिकांना जेवण खाऊ घालेल किंवा गरीब लोकांना मी काहीतरी दान करेन किंवा कसलेतरी दान मी करेन किंवा घरात कोणाला 11 लोकांना बोलावून जेवण करावे किंवा सत्यनारायणाची पूजा करेन ही तुमच्या मनात असेल जे गोष्ट तुम्हाला शक्य असेल तीच गोष्ट बोला.

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जे शक्य असेल तेच बोलावे किंवा जे शक्य नाही ते तुम्ही बोललात आणि तुम्हाला काहीतरी मिळालं इच्छा पूर्ण झाली म्हणजे शक्य नाहीये ते तुम्हाला होणारच नाहीये तुम्ही केलेच नाही तर मग समस्या येऊ शकतात.

मित्रांनो, म्हणून इच्छा बोलताना अशी गोष्ट बोला की मी 11 बालकांना 11 बालिकांना कुमारिकांना घरी बोलावून त्यांना जेवण खाऊ घालेल किंवा मी गरिबांना 11 गरिबांना काहीतरी वस्तू कपडे धान्य दान करेल किंवा मी मंदिरात येईल दर्शन घेईल कोणते ला जाईल दर्शन असं काहीतरी अशक्य आहे.

 

तुमच्याकडून ते बोलावं आणि तो नारळ देवघरात ठेवून द्यावा. त्या दिवसापर्यंत ठेवावा ज्या दिवसा पर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाहीत.

काही दिवसात तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल एक, दोन महिना लागतील पण इच्छा पूर्ण होईलच. पण जेव्हा तुम्हाला असं वाटेल की मी नवस बोलला होतो इच्छा मागितली होती ती आता पूर्ण झाली आहे. तेव्हा तो नारळ तुम्ही वाहत्या पाण्यात समुद्रात तलावात त्याचे विसर्जन करावे आणि एक-दोन दिवसातच जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही देवाला जो नवस बोलला आहे तो पूर्ण करावा.

 

वरील माहिती ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोशातून तसेच इतर शास्त्रांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेले आहे याचा कोणीही अंधश्रद्धेचे संबंध जोडू नये ही विनंती.

 

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहितीसाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment