ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं असं महत्त्व आहे. राहु आणि केतु हे ग्रह सोडले तर प्रत्येक ग्रहाकडे कोणत्या ना कोणत्या राशीचं स्वामित्त्व आहे. त्यात काही ग्रहांचं एकमेकांशी पटत नाही. मग शत्रूचं स्वामित्व असलेल्या राशीत प्रवेश केला की त्याचा आणखी वेगळा प्रभाव असतो. दुसरीकडे, गोचर केलेला ग्रह कोणत्या स्थानात विराजमान आहे यावरूनही भाकीत केलं जात. ज्योतिषशास्त्रात 12 स्थानं सांगितली गेली आहेत. त्यावरून ग्रहांचा प्रभाव कसा पडणार हे सांगितलं जातं. असं सर्व गणित असताना गोचर कुंडलीत शुभ असा गजकेसरी योग तयार होत आहे. त्याचा सकारात्मक प्रभाव पडेल. 18 जानेवारीला चंद्र ग्रह मेष राशीत प्रवेश करेल. या राशीत गुरु ग्रह असल्याने युती होत गजकेसरी योग तयार होईल. कृष्णपक्षातील अष्टमीतला चंद्र असल्याने त्याची कला कमी होत जाईल हे देखील महत्त्वाचं आहे. एकंदरीत शुभ असल्याने राशीचक्रातील तीन राशींवर प्रभाव पडेल. कोणत्या राशींना लाभ मिळणार ते जाणून घेूऊयात..
या तीन राशींना मिळणार लाभ
मेष: य राशीच्या पहिल्या म्हणजेच लग्न स्थानात गजकेसरी योग तयार होत आहे. त्यामुळे त्याचा थेट प्रभाव व्यक्तिमत्त्वावर पडेल. आत्मविश्वासात दुपटीने वाढ होईल. समाजात मानसन्मान प्राप्त होईल. लोकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून भारावून जाल. कौटुंबिक पातळीवर तुमचे संबंध आणखी दृढ होतील. करिअरमधील काही गोष्टी सहजरित्या मिळतील.
मकर : या राशीच्या चतुर्थ स्थानात गजकेसरी योग तयार होत आहे. हे स्थान वाहन आणि प्रॉपर्टीशी निगडीत आहे. त्यामुळे भौतिक सुखांची अनुभूती होईल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. तसेच जे लोक रियल इस्टेट, जमीनीशी निगडीत व्यवसाय करतात त्यांना फायदा होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना काही भेटवस्तू मिळू शकतात.
मीन : या राशीच्या धन आणि वाणी स्थानात गजकेसरी योग तयार होत आहे. त्यामुळे शुभ अशा गजकेसरी योगाचा लाभ होईल. अचानकपणे धनलाभ होऊ शकतो. भौतिक सुखांची अनुभूती होईल. कौटुंबिक पातळीवरील काही वाद दूर होतील. आपल्या वक्तव्याचा सकारात्मक प्रभाव समोरच्या व्यक्तींवर पडेल.