मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन चौथ्या गुरुवारी करावे की पाचव्या? याची माहिती वाचा.

 

 

मैत्रिणींनो नमस्कार यावर्षी मार्गशीर्ष चे पाच गुरुवार आले आहेत. प्रत्येक वर्षी चार किंवा पाच असे येत असतात. मार्गशीर्ष महिना हा खूप महत्त्वाचा असतो. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा विवाहित महिलांसाठी खूप महत्त्वाचा असतो. कारण विवाहित प्रत्येक महिला व्रत करते उपवास करते, पूजा पाठ करते. म्हणून मैत्रिणी मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्त्व असते. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते.

 

सुहासिनी बायकांना घरी बोलून त्यांना गोड गोड खायला देऊन त्यांची ओटी भरली जाते

मैत्रिणींनो, यावर्षीचे उद्यापन चौथ्या गुरुवारी करायचे की पाचव्या? असा प्रश्न उद्भवत आहे. कारण यावर्षी पाच गुरुवार आले आहेत. पाचवा गुरुवार आहे . तो 11 जानेवारी ला आहे. तो आहे शेवटचा गुरुवार पण त्या दिवशी अमावस्या आहे.

 

बरेच जण असे म्हणतात की अमावस्या असल्यामुळे उद्यापन करू नये. त्यामुळे आम्ही उद्यापन करू शकत नाही. करावेत करू नयेत असे प्रश्न पडतात. परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या श्री महालक्ष्मी ची सर्वात मोठी देवता आहे. देवी देवता यांना अमावस्या किंवा राहुकाल यांचा काहीच प्रभाव पडत नाही.

 

म्हणून आपण पाचवा गुरुवार तो आहे 11 जानेवारीला आपण उद्यापन करावे त्यादिवशी विधीपूर्वक पूजा पाठ करावे. उपवास करावा कथा वाचन करावे. व इतर महिलांना बोलवून त्यांची ओटी भरावी. काहीच प्रश्न मनात ठेवू नये. कोणतीच भीती मनात ठेवू नये. अमावस्या चा जो काय विषय आहे तो मनातून काढून टाकावा. एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला पाच गुरुवार महालक्ष्मीचे सेवा करण्यास उपासना करण्यास मिळत आहे. म्हणून पाच गुरुवार करा.

Leave a Comment