मार्गशीर्ष गुरुवारी फक्त एक दिवा इथे लावा ; लक्ष्मी होईल प्रसन्न!

 

 

मित्रांनो, सगळीकडेच मार्गशीर्ष महिन्याची चाहूल लागली आहे. मार्गशीर्ष महिना म्हटला की, लक्ष्मीच्या व्रताची आठवण येतेच.अखंड विश्वाचे श्री विष्णू यांचा सर्वाधिक आवडता महिना म्हणजेच मार्गशीष महिना. लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी व्रतवैकल्ये मार्गशीर्ष महिन्यात केले जातात.आपल्या सर्व गोष्टी प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतात. मार्गशीष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी स्त्रिया लक्ष्मी मातेची पूजा मनापासून करतात, महिन्यातील प्रत्येक गुरुवारी पूजा मांडली जाते आणि लक्ष्मी मातेची पूजा करून तिची आरती केली जाते, गुरुवारी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो.

 

या मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार आलेले आहेत. त्यामध्ये 9 डिसेंबर, 16 डिसेंबर, 23 डिसेंबर आणि 30 डिसेंबर या दिवशी गुरुवार आलेले आहेत. या गुरुवारच्या पूजेबरोबरच आणखीन काही उपाय जर आपण करून पाहिले तर आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल, घरात धनसंपत्तीत वाढ होईल, व्यवसाय मध्ये खूप फायदा होईल, नोकरीमध्ये बढती मिळेल आणि विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होण्यास मदत होईल. एकूणच आपल्या घरातील वातावरण आनंदी राहील.

 

असाच एक उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमच्या घरातील पैशांमध्ये वाढ होऊन लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुम्हाला लागेल चला तर मग पाहूया हा कोणता आहे हा उपाय. घरामधील पैशांमध्ये वाढ होण्यासाठी तुम्ही एका दिव्याचा छोटासा उपाय करू शकता, हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका दिव्याची गरज आहे. हा दिवा कोणत्याही प्रकारचा असला तरी चालेल,त्यामध्ये कणकेचा दिवा, मातीचा दिवा किंवा पितळेचा दिवा घेतला तरी चालेल.

 

पण तो दिवा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे. तुपाचा दिवा जर वापरला तर त्याचा फायदा खूपच होईल. यामध्ये गायीचे तूप वापरायचे आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळदीचा वापर करायचा आहे, त्यामध्ये हळदीचा वापर केल्याने त्यात तुपाची शुद्धता भरून येईल. हा उपाय शक्यतो संध्याकाळच्या वेळेस किंवा शक्य असल्यास रात्रीच्या वेळी करायचा आहे. सूर्य मावळल्यानंतर हा उपाय केला तरी चालेल. गुरुवारच्या या चार गुरुवारी जर तुम्ही दीपदान केल्यास श्री विष्णू व लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होण्यास सुरुवात होईल.

 

तुम्ही गुरुवारी श्री विष्णू च्या फोटो समोर दिवा प्रज्वलित करायचा आहे. केवळ एकच दिवा श्री विष्णू व लक्ष्मी माते च्या फोटो समोर प्रज्वलित करायचा आहे.पण या दिव्याची वात पेटवताना,कापराच्या सहाय्याने प्रज्वलित करायचा आहे. केवळ चार मार्गशीर्ष गुरुवार हा उपाय केल्याने श्रीहरी, श्री विष्णू प्रसन्न होतात. तसेच लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल.

 

तसेच आपल्या गावांमध्ये किंवा शहरांमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी लक्ष्मीनारायणाचे मंदिर किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या मंदिरात जाऊन, तुम्ही दीपदान करायचे आहे. कापराच्या साह्याने तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. ज्याप्रमाणे कार्तिक महिन्यात दिव्याचे महत्व असते, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात सुद्धा दीपदान अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण लक्ष्मी मातेकडे प्रार्थना करायची आहे की, आपल्या घरात सुख-समृद्धी व पैशांची भरभराट होऊ दे,प्रत्येक कामात यश प्राप्त होऊ दे.

 

केवळ चार मार्गशीर्ष गुरुवार हा उपाय केल्याने श्रीहरी, श्री विष्णूनारायण व लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होतील. जर तुम्हाला देखील तुमच्या घरी सुखसमृद्धी नांदावी, पैशाची टंचाई कधीच भासू नये, कायम पैशाची बरकत रहावी, अडी अडचणी संकटे दूर व्हावीत असे जर वाटत असेल तर मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी हा उपाय नक्की करून पहा.

Leave a Comment