मित्रांनो, आपल्या प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवी असते. या कुलदेवीची आराधना करणे हे अत्यंत गरजेचे असते. कुलदेवीच्या अशाच काही चार गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही केल्याने तुमचे कुटुंब हे सुखी होईल. कोणत्याही गोष्टीचीआपणाला कमतरता भासणार नाही. मित्रांनो आपल्या घरातील जर विवाहित स्त्रीने या चार गोष्टी केल्या तर त्या गोष्टीचा, त्या सेवेचा आपणा सर्वांना लाभ होईल.आपल्या घरात आनंदमय वातावरण निर्माण होईल.
तर मित्रांनो जाणून घेऊया या चार गोष्टी आहेत तरी कोणत्या. यातील पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या कुलदेवतेची मूर्ती. प्रत्येकाचे एक कुलदैवत असते. त्या कुलदैवताची मूर्ती आपल्या घरी असली पाहिजे आणि या मूर्तीची पूजा ही दररोज व्हायला पाहिजे. विवाहित स्त्रीने सकाळ, संध्याकाळ या मूर्तीची पूजा करणे आवश्यक आहे.
दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे कुलदेवीचा मंत्र जप. दररोज आपली जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा मंत्र जप एक माळ करावी. आपली जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा एक मंत्र असतो किंवा त्या कुलदेवीचे नाव जरी घेऊन मंत्र जाप केला तरीही चालेल. जर तुम्हाला मंत्र जप माहीत नसेल व कुलदेवीही माहीत नसेल तर ओम कुलदेवताय नमः असे जप केले तरी चालेल.
तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवीचा वार. आपली जी कुलदेवी आहे तिचा जो वार असेल त्यावारी आपण उपवास करावा. खासकरून विवाहित महिलांनी. दुसऱ्या कोणत्याही वारी उपवास नाही केला तरी चालेल. पण चतुर्थी, एकादशी आणि आपल्या कुलदेवीच्यावारी उपवास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहीत नसेल तर तुम्ही मंगळवार करावा. मंगळवार हा देवीचा वार असतो. तुम्ही कुलदेवीचा उपवास केल्याने तुमच्या सर्व कुटुंबाला त्याचा लाभ होईल.
चौथी गोष्ट म्हणजे आपल्या सर्व कुटुंबाने वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीचे दर्शन हे घ्यावे. दर्शन घेतल्यानंतर घरातील विवाहित स्त्रीने साळी देऊन कुलदेवीची ओटी भरावी. हे अत्यंत गरजेचे आहे. बर्याचशा लोकांना माहित नसते. ते फक्त दर्शन घेऊन बाहेर पडतात.परंतु कुलदेवीची ओटी भरणे हे अत्यंत गरजेचेआहे.
तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे जर या चार गोष्टी तुम्ही केल्या तर तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि तुमचे घर हे सुखी समाधानी व आनंदमय राहिल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.