वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रहाचे यंदा सर्वात मोठे गोचर झाले आहेत. २२ एप्रिलला गुरूने आपल्या स्वराशीत म्हणजेच मेष मध्ये प्रवेश घेतला आहे. याच राशीत गुरुचा उदय होऊन ते आता सक्रिय झाले आहेत. परिणामी काही राशींच्या कुंडलीत काहीसे बदल दिसून येण्याची शक्यता आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार पुढील १८ महिने म्हणजेच साधारण दीड वर्ष गुरु याच स्थानी कायम असणार आहे. दरम्यान गुरुदेव अस्त, उदय, वक्री होऊन आपल्या स्थितीत बदल करतील पण त्यांचा स्थायी प्रभाव काही राशींवर कायम दिसून येऊ शकतो.
काही राशींमध्ये गुरु व राहूची युती होऊन बनलेला गुरु चांडाळ योग दिसून येत आहे तर काहींना मात्र लक्ष्मी नारायण राजयोग, केंद्र त्रिकोण राजयोग अशा रूपात लाभाची चिन्हे आहेत. आज आपण कोणत्या राशीला पुढील १८ महिने गुरुकृपेने लाभाची चिन्हे आहेत हे पाहूया…
मेष रास
मेष या मंगळाच्या राशीत गुरू-राहू-हर्षल यांचा एकूण सहवास कौटुंबिक सौख्याला त्रासदायक ठरला तरी गुरूची सप्तम स्थानावरील दृष्टी आकाशतत्त्वाच्या नियमाप्रमाणे व्यापक राहील. गैरसमज, वादविवाद फारसे विकोपाला जाणार नाहीत तर व्ययातील मीनेचा नेपच्यून चतुर्थस्थानावर आपली नवपंचम दृष्टी कायम शुभदायक ठेवील. अष्टमेश, लग्नेश मंगळ कुठल्याही स्थानात असला तरी वाहनवेगाचा अतिरेक टाळावा. भाग्येश गुरू लग्नी आहे. राहू जरी सोबत असला तरी गुरू आपल्या उद्योगधंद्यात, नोकरीत मदतीचा ठरेल. नोकरीत नवा बदल, नव्या योजना नकोत. २८ नोव्हेंबरनंतर मात्र त्याचा जरूर विचार करा. त्यात आपल्याला यश लाभेल.
वृषभ रास
व्ययास जरी गुरू-राहू असले तरी दशमातला कुंभेचा शनी आपल्या अस्तित्वातून खूपशा समस्यांना शांत करील. नवमेश दशमात शनी अशा वेगळ्या आशयातून शनीचे वागणे त्याच्या उच्चत्वाला शोभून दिसेल. गुरू जरी राहूच्या चांडाळ योगात फसलेला असला तरी त्यांचा शनीशी होणारा संवाद सुखद, आशीर्वादपरच असणार आहे. व्ययातील हे गुरू-राहू अध्यात्म व गूढ विद्येला खूपसे पूरक ठरणारे असते. वृषभ रास ही हळवी रास स्वत:ला फार त्रास करून घेते पण अशा वेळी नेपच्यूनचे साह्य लाभेल. विचार बदलले की मार्ग बदलतो म्हणून अशा वेळी सकारात्मक विचार, धार्मिक वाचन, मित्रमंडळींत विचारविनिमय, चर्चा यांतून मनाला खूपशी शांतता लाभेल. नोव्हेंबरनंतरचा काळ खूप आनंदी वातावरण निर्माण करील.
कर्क रास
कर्क राशीला चंद्र-गुरू युती लाभदायक ठरून ही मंडळी बौद्धिक क्षेत्रात खूप महत्त्वाच्या पदावर पोहचू शकतात. दशमातील गुरू आनंदी, सांसारिक सुख भोगणारा उच्च मनोवृत्तीचा असतो. विशेष म्हणजे मेष राशीतील गुरू राजकारण, सामाजिक क्षेत्रात उद्योगधंद्यात आपले कर्तृत्व उत्तमरीतीने दाखवून देतो पण या वेळी गुरूसोबत राहूचे सान्निध्य काहीसे विपरीत गोष्टी घडवून आणण्याकडे असेल! कारण हा दशमस्थानात होणारा चांडाळ योग अहंभाव, गर्विष्ठपणा याकडे झुकला जाईल. पण या सर्वांवर नजर ठेवून असलेला मीन राशीतील नेपच्यून गुरूला आपल्या सत्कर्माची योग्य जाणीव करून देईल. नोव्हेंबर २८ नंतर त्याला आपल्या सन्मानाच्या जागी योग्यरीतीने बसवील.
अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.