येत्या दिवाळीमध्ये पूजेसाठी झाडू विकत घेतांना करु नका ही चूक! लक्ष्मी मातांना अशाप्रकारे करा प्रसन्न!

मित्रांनो दिवाळी मधील सर्वात महत्त्वाचा सण किंवा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजन हा दिवस अत्यंत जल्लोषात साजरा केला जातो. या दिवशी धन, लक्ष्मी माता आणि गणपती बाप्पाची पूजा केली जाते.

तसेच धनदेवता कुबेराची देखील आराधना केली जाते. हा दिवस व्यापारी वर्गासाठी फार महत्त्वाचा असतो. यावेळी ते विशेष वही पूजन करतात.

दिवाळीचा सण म्हणजेच दिवाळी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरी केली जाते. यंदाची दिवाळी 12 नोव्हेंबर 2023 रोजी साजरी होत आहे. श्रीमंतीची देवी लक्ष्मी आणि बुद्धीची देवता गणपती यांची दिवाळीला पूजा केली जाते.

दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन झाडू ची पूजा केली जाते आणि जुने झाडू बाहेर काढले जातात, अशी मान्यता आहे. झाडू ची पूजा बरेच लोक करतात. तुमच्या पैकी ही भरपूर लोक नवीन झाडू दिवाळीच्या वेळेस घेत असतील आणि त्याची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजन करत असतील आणि जुने झाडू बाहेर काढत असतील. तर भरपूर लोकांना प्रश्न पडतो की नवीन झाडू कोणत्या दिवशी आणावे?

बरेच लोक धनतेरसच्या दिवशी किंवा दिवाळीच्या दिवशी अशी शॉपिंग करत असतात आणि इतर सामान किंवा झाडू विकत घेत असतात. परंतु मित्रांनो हा झाडू घेण्याचा खास दिवस असतो. तुम्ही कोणत्याही दिवशी झाडू घेऊ शकत नाही. झाडू आणण्यासाठी एक शुभ दिवस असतो. तो शुभ दिवस कोणता आहे आपण जाणून घेऊयात. झाडूला लक्ष्मीमातेचे एक रूप मानले जाते.

धनत्रयोदशी किंवा धनत्रयोदशीला विविध वस्तूंची खरेदी करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की धनत्रयोदशीला खरेदी केलेली कोणतीही वस्तू नष्ट होत नाही आणि तेरापट वाढते. त्यामुळे सामान्य लोक धनत्रयोदशीला सोने, चांदी, जमीन, वाहने आणि घरगुती वस्तू खरेदी करतात. या वस्तूंसह झाडू खरेदी करण्याची अनोखी परंपरा देखील आहे. लोक सोने आणि चांदी किंवा त्याचे दागिने खरेदी करतात किंवा नाही, ते निश्चितपणे झाडू खरेदी करतात. धनत्रयोदशीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीच्या हातात एक झाडू नक्कीच दिसतो. ज्योतिषाचार्य पीके युग मत्स्य पुराणात सांगितले की झाडूला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते.

मित्रांनो 9 तारखेपासून वसुबारस नंतर दिवाळी सुरू होईल. तर मित्रांनो तुम्ही दिवाळीच्या पूजेसाठी झाडू घेत आहात किंवा इतर वर्षभरात आपल्याला झाडू लागतो. तर हा झाडू फक्त शनिवारच्या दिवशी घेतला पाहिजे. मग ते दिवाळीच्या पूजेसाठी असेल किंवा घरात वापरण्यासाठी आपण झाडू घेत असाल तर तो फक्त शनिवारच्या दिवशी घेतला पाहिजे.

आता दिवाळीच्या अगोदर येणाऱ्या शनिवारी आपणाला झाडू खरेदी करायचा आहे. तर दिवाळीच्या अगोदर पहिला शनिवार हा 11 नोव्हेंबर या दिवशी आला आहे. म्हणजेच 11 नोव्हेंबर तुम्हाला झाडू खरेदी करून घरी आणायचा आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या झाडूचे पूजन तुम्हाला करायचे आहे आणि जुनी झाडू बाहेर काढायचे आहे.

झाडू खरेदी करताना या गोष्टी लक्षात असू द्या – पंडित सांगतात की यावेळी बाजारात सर्व प्रकारचे झाडू उपलब्ध आहेत. ही खरेदी धर्माशी संबंधित असल्याने काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. झाडू दाट असावे. झाडू जितका दाट असेल तितका त्याचा सकारात्मक परिणाम होईल आणि तितक्याच वेगाने नकारात्मक परिणाम कमी होईल. याशिवाय झाडू तुटलेले नाहीत याची खात्री करुन घ्या. कारण तुटलेला किंवा खंडीत झाडू अशुभ मानला जातो.

दीपावलीच्या दिवशी सर्व घरांमध्ये झाडूची पूजा केली जाते, त्यामुळे या दिवशी नवीन झाडू खरेदी करून लक्ष्मीपूजनात ठेवा. दीपावलीच्या दिवशी किंवा इतर दिवशीही झाडूला कधीही पाय लावू देऊ नका, तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार नाही. झाडूवर पाऊल ठेवणे हे अशुभ मानले जाते, याचा अर्थ घरातील लक्ष्मीला अडखळणे होय. जर आपण झाडूचा आदर केला तर ते महालक्ष्मीच्या आनंदाचे लक्षण आहे.

नवीन घर/इमारत बांधल्यानंतर त्यात जुनी झाडू बाळगणे अशुभ मानले जाते आणि ते अशुभ आहे. जेव्हा नवीन झाडू वापरायचा असेल तेव्हा शनिवारपासून त्याचा वापर सुरू करा. घरात कधीही झाडू उलटा ठेवू नये, ते अशुभ मानले जाते. पौराणिक ग्रंथांमध्ये असे म्हटले गेले आहे की अंधार पडल्यानंतर घर झाडून काढणे अशुभ आहे, त्यामुळे दीपावलीच्या दिवशी अंधार पडण्यापूर्वी घराचा कचरा स्वच्छ करा.

तर मित्रांनो तुम्हीदेखील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडू ची पूजा करीत असाल तर शनिवारच्या दिवशी झाडू खरेदी करा आणि लक्ष्मीपूजन या दिवशी त्या झाडूची पूजा करा.

Leave a Comment