ही एक गोष्ट सोडाल तरच होईल स्वामींची कृपा! अशक्य ही शक्य करतील स्वामी

मित्रानो, म्हणतात ना की माणूस अज्ञानान करत नाही इतकं नुकसान अहंकार करून घेतो. अशीच काही ही आगळी वेगळी आजची लीला आहे. स्वामी महाराज अक्कलकोट मध्ये होते तेव्हा आसपासच्या गावात नेहमी फिरायला जात असत.

असच एक दिवस अक्कलकोट पासून ७ किलोमीटर कोसावर एक केसी म्हणून गाव होत. महाराज त्याठिकाणी फिरायला गेले होते. गावचा पाटील आप्पा पाटील हा स्वामींचा फार मोठा निस्सीम भक्त होता.

महाराज या केसी गावात वारंवार जात असत. या वेळी गेल्यावर महाराज केसी गावच्या हनुमान मंदीरात उतरले. महाराज आपल्या गावात आले म्हटल्यावर आप्पा पाटील यांना प्रचंड आनंद झाला.

त्याने महाराज आणि महाराजांबरोबर आलेल्या भक्तांची खाण्याची आणि राहण्याची उत्तम सोय केली. आणि ही सेवा करत असताना तो मनापासून स्वामींची सेवा करत होता. स्वामी महाराज केसी या गावात आलेत म्हटल्यावर ही बातमी आसपासच्या पंचक्रोशीत पसरली.

तसेच ही बातमी केसी या गावापासून काही अंतरावर असणाऱ्या नलबुद्रुकाच्या असिस्टंट कलेक्टर साहेबांपर्यंत पोहोचली. आता महाराज आलेत म्हटल्यावर कलेक्टर साहेब आपल्या लवाजम्यासह त्यामध्ये एक फौजादर देखील होता. त्याला घेऊन स्वामी महाराजांच्या दर्शनाला आले.

आता असिस्टंट कलेक्टर साहेब येत असताना असिस्टंट कलेक्टर म्हणून आलेले ना की स्वामी भक्त म्हणून कलेक्टर साहेबांनी दर्शन घेतलं आणि महाराजांना विनंती करू लागले की आमच्या गावात यावे.

यावरती स्वामी महाराज म्हणाले की छोटा घोडा घेऊन ये मग आम्ही येतो. याचा अर्थ कलेक्टर ला वाटला की महाराजांना बसायला छोटा घोडा हवा आहे. आणि तो घेऊन आल्यास महाराज आपल्या बरोबर येतील.

परमात्मा, परब्रह्म स्वामी महाराज सांकेतिक भाषेत बोलत. याचा अर्थ होता की तुम्ही तुमच्या सोबत आणलेला अहंकार बाहेर ठेवा. मग माझ्यापर्यंत या मग मी तुमच्यासोबत नक्की येईन. कलेक्टर साहेब जे ऐकले त्या प्रमाणे कामाला सुरुवात केली.

म्हटलं तर कलेक्टर साहेबां चा घोडही लहानच होता. कलेक्टर साहेबांनी फौजदार आदेश सोडला की माझा घोडा माझा घोडा स्वामींना देतो. तू माझ्यासाठी मोठ्या घोड्याची व्यवस्था कर. त्याप्रमाणे फौजदार गावभर घोडा शोधत फिरू लागला.

शोधत असताना त्याला आप्पा पाटील. म्हणजे जे महाराजांचे निस्सीम भक्त होते त्यांची घोडी दिसली. आणि ती घोडी आप्पा पाटील धरून घेऊन येऊ लागला. फौजदार घोडी घेऊन येऊ लागला. त्यांच्या घरी त्यांची फक्त म्हातारी आई होती. ती म्हणत होती की घोडी आप्पा पाटील आल्यावर घेऊन जा.

पण तो फौजदार एकायला तयार नाही. फरफटत घेऊन आला. इकडे त्या आजीबाई तडक मंदीरात आल्या जिथे आप्पा पाटील स्वामींची पूजा करत होता. आणि त्यांनी सर्व हकीकत आप्पा पाटीलांच्या कानावर घातली.

ते ऐकून आप्पा पाटील यांनी वाटेतच फौजदाराला आडवले. आणि त्याला सांगितले मी गावाचा पाटील आहे तुम्हाला एक नाही चार घोडे देतो. या घोडीला सोडावे.हे ऐकून फौजदार चा स्वाभिमान दुखावला. एक पाटील फौजदाराला कसा आडवू शकतो. ते देखील कलेक्टर च्य आदेशाला त्यानंतर दोघांमध्ये बराच वाद झाला. त्यानंतर फौजदाराला आप्पा पाटील यांची घोडी सोडून दिली. दुसऱ्या घोड्याची व्यवस्था करून असिस्टंट कलेक्टर साहे बांकडे पोहोचला.

यानंतर कलेक्टर साहेब परत स्वामी महाराजांकडे गेले. महाराज लहान घोड्याची व्यवस्था झालेली आहे. आता आमच्याबरोबर यावं. यावर महाराज चिडक्या स्वरात म्हटले “आम्ही येत नाही तूच बैस, महाराज येत नाहीत.” हे पाहून कलेक्टर साहेब बरेच नाराज झाले.

महाराजांनी कलेक्टर साहेबांना सर्वांसमोर नकार दिला. हे पाहून कलेक्टर साहे बांचा अजून स्वाभिमान दुखावला. याजगी तूप टाकण्याचं काम फौजदारी केलं. फौजदार म्हणाला की पाटील खूपच मगरुर आहे.

त्यानं वेळेत घोडा न दिल्यानं स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर झाली नाही. तुमच्या आदेशानुसार मी त्याची घोडी घेऊन येत असताना त्याने मला वाटेत शिवीगाळ केली. आणि घोडी काढून घेतली. म्हणून महाराज आपल्या बरोबर आले नाही.

असिस्टंट कलेक्टर साहेबांची तळपायातली आग मस्तकात गेली. गावचा पाटील म्हणून आप्पा पाटील कलेक्टर साहेबांना पोहोचवायला गेला असता. कलेक्टर साहेबांनी त्याला खूप शिव्या दिल्या. तुला मस्ती आली आहे तुझी खोड मोडली पाहिजे.

यानंतर बऱ्याच विनवण्या कलेक्टर साहेबांना आप्पा पाटील यांनी केल्या. कलेक्टर साहेब काही ऐकून घ्यायच्या मूळ मध्ये नव्हते. त्यांनी सर्व समोर प्रतिज्ञा केली की आप्पा पाटील तुझ्या पायात पुढच्या आठ दिवसात बेड्या नाही घातल्या तर असिस्टंट कलेक्टर नाही.

घोड्यावर टाप मारून निघून गेले. आप्पा पाटील यानंतर प्रचंड चिंतेत पडले. तडक स्वामी महाराजांकडे आले. आणि स्वामी महाराजांच्या कानावर घालून त्यांच्या विनवण्या केल्या आपण तर कृपा घन आहार आपण दयाळू आहात एका भक्ताच्या रक्षणासाठी आपण सदैव तत्पर असतात.

कृपा करून मला या येणाऱ्या संकटातून सोडवावे. हे शब्द कानी पडताच स्वामी महाराज अतिशय चिडले. जणू की साक्षात रुद्रच. रागवून स्वामी महाराज बोलले. हरमखी लाख लाख कोड्याने करू.

हरमखोरास गडीपर करून देऊ. या सांकेतिक शब्दांचा अर्थ असा होतो. कोडे करू याचा अर्थ त्याला योग्य ती शिक्षा करू. आणि गडीपार याचा अर्थ त्याच जे स्थान आहे त्याचं ज पद आहे त्या पदावरून कमी करू.

यानंतर पुढील २ ते ३ दिवसात स्वामी महाराज अक्कलकोटला निघून गेले. इकडे आप्पा पाटील चिंतेत होते पण गरुडाच्या पिल्लांना कधीही सापाची भीती नसते. त्याचप्रमाणे स्वामीभक्त काळाची, संकटाची किंवा इतर कोणत्याही गोष्टीची कधीच भीती नसते.

ज्याप्रमाणे स्वामी बोललेले त्याचप्रमाणे ज्या असिस्टंट कलेक्टर नी आप्पा पाटील यांना स्वामी भक्ताला बेड्या घालण्याची प्रतिज्ञा केली होती. त्याच्याच पायात बेड्या पडल्या त्याचं पद गेलं.आणि जो फौजदार आप्पा पाटील यांची घोडी नेत होता त्याचंही प्रचंड नुकसान झालं ज्या असिस्टंट कलेक्टर नी आप्पा पाटील यांना स्वामीभक्त बेड्या घालण्याची प्रतिज्ञा केली होती…

पुढच्या आठ दिवसात त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊन त्याची नोकरी गेली आणि त्याच्या पायात बेड्या पडल्या. त्या फौजदार नुकसान झालं ज्या भक्तावर स्वामी कृपेच कवच असते काळ किंवा कोणतीही परिस्थिती काही करू शकत नाही.महाराजांनी आपल्या भक्ताला दिलेलं वचन म्हणजे ” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” हे तंतोतंत पाळतात.

Leave a Comment