दसऱ्यानंतर आता दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. दुर्गा पूजा संपल्यावर लोक दिवाळीच्या तयारीला लागतात. वैदिक पंचांगानुसार, या वर्षी दिवाळीच्या दिवशी अनेक राजयोग तयार होत आहेत.याचा अनेक राशींच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे.
दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा आराधना केली जाते. यामुळे घराची आर्थिक परिस्थिती चांगली राहते. याबाबत देवघरचे ज्योतिषाचार्य यांनी माहिती दिली. दिवाळीला कोणता राजयोग तयार होत आहे आणि कोणत्या राशींवर याचा सकरात्मक प्रभाव पडत आहे, याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
यावर्षी दिवाळी 12 नोव्हेंबरला साजरा केली जाणार आहे. दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा आराधना केल्याने घरातील दरिद्रता दूर होते. तसेच घरात माता लक्ष्मीचे आगमन होते. तसेच या वर्षी 500 वर्षांनी असा योग तयार होत आहे की, दिवाळीच्या दिवशी अनेक राजयोग बनत आहेत.
तूळ राशीवर बुध आदित्य राजयोग तयार होत आहे. यासोबतच शशराजयोग आणि सर्वार्थ सिद्धी योग देखील या दिवशी तयार होणार आहेत. 500 वर्षांनंतर दिवाळीच्या दिवशी हा अद्भुत योगायोग घडणार आहे. त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा तीन राशींवर होणार आहे. यामध्ये मेष, मिथुन आणि मकर राशीचा समावेश आहे.
मेष राशी: या राशीच्या लोकांची वेळ वाईट होती. ती वेळ यादिवशी चांगली होऊन जाईल. दिवाळीच्या दिवशी तीन राजयोग पडत असल्याने मेष राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा होईल. व्यवसायात असलेली मंदी सुधारेल. तसेच जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर दिवाळी हा सर्वात शुभ दिवस आहे. यासोबतच खर्चापेक्षा उत्पन्न जास्त असेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढतील. या राशीच्या लोकांचे आरोग्यही चांगले राहील.
मिथुन राशी: या राशीच्या लोकांवरही लक्ष्मी मातेची कृपा होणार आहे. जर तुम्हाला नवीन वाहन खरेदी करायचे असेल तर दिवाळीची वेळ योग्य आहे.तसेच जमीन, फ्लॅट खरेदी करायचे असेल तर दिवाळीला घेतल्याने लाभ मिळेल. यासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग तयार होत आहे.
मकर राशिः या राशीच्या लोकांसाठी दिवाळीचा दिवस हा सर्वात शुभ राहणार आहे. मकर राशीच्या लोकांना चांगली आनंदाची बातमी मिळू शकते. अनपेक्षित पैसे मिळण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायात वाढ होईल. जोडीदारासोबतचे संबंधही मधुर राहतील. जे काही प्रलंबित काम असतील, ते पूर्ण होतील. लक्ष्मी मातेची विशेष कृपा मकर राशीच्या लोकांवर होईल आणि त्यांना सर्व कार्यात यश मिळेल.