आज कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री हे अवश्य करा अडचणी होतील दूर!

हिंदू कॅलेंडरनुसार, कोजागिरी पौर्णिमा अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. आपण त्याला रास पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा किंवा कौमुदी व्रत म्हणूनदेखील ओळखतो. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी चंद्र 16 कलांनी भरलेला असतो. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी देवी पृथ्वीवर येते असे मानले जाते.

हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. स्त्रिया या दिवशी उपवासदेखील करतात. ज्योतिष शास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेला काही उपाय केल्याने आर्थिक संकट, पैशाची तंगी आणि इतर अनेक त्रासांपासून मुक्ती मिळू शकते. या दिवशी कोणते उपाय करावेत. चला जाणून घेऊया.

जर तुमच्याकडे कायम पैशाची कमतरता राहात असेल किंवा तुमच्या कष्टाने कमावलेला पैसा तुमच्या हातात टिकत नसेल. तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीची पूजा करा आणि 5 ते 7 कवड्या सोबत ठेवा. सकाळी या कवड्या लाल किंवा पिवळ्या रेशमी कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवा. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

धार्मिक मान्यतेनुसार कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आकाशातून अमृतवृष्टी होते, त्यामुळे रात्री चंद्राच्या प्रकाशात चांदीच्या भांड्यात खीरही ठेवावी. ही खीर रात्रभर अशीच राहू द्या. यानंतर घरात एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्याला खाऊ घाला. यामुळे जुनाट आजार बरे होतात अशी मान्यता आहे.

जर तुम्हाला खूप दिवसांपासून पैशाच्या तुटवड्याचा सामना करावा लागत असेल. तर यापासून सुटका मिळवण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेला सुपारी अर्पण करा. ही सुपारी लाल रंगात गुंडाळा आणि अक्षता आणि कुंकू लावून लक्ष्मीच्या चरणी ठेवा. लक्ष्मीची पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या धनस्थानावर ठेवा. असे केल्याने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील.

नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री हनुमानजीसमोर चारमुखी दिवा लावा. असे केल्याने आजूबाजूला असलेल्या नकारात्मक शक्ती दूर होतात असे मानले जाते. यासोबतच नोकरी-व्यवसायात प्रगती होईल.

Leave a Comment