मित्रानो, आपण सर्वजण आपनित्यनियमाने आपल्या कुलदैवत किंवा देवी देवतांची पूजा करत असतो. परंतु तरीही काही वेळेस आपल्याला या पूजेचे फळ मिळत नाही. आपल्या ईच्छित मनोकामना पूर्ण होत नाही. कारण आपल्या कडुन पूजा करताना कळत नकळत काही चुका होत असतात.
तसेच आपण अवेळी पूजा करतो. आपल्याला पूजा करत असताना वेळ देखील पाळणे गरजेचे असते. मित्रांनो हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार चोवीस तासांमध्ये दोन अशा वेळा असतात त्याना खुप वाईट समजले जाते. त्याना राहू व केतू काळ म्हणतात. या राहू आणि केतू काळात केली जाणारी पूजा निष्फळ ठरते.
आठवड्यातील प्रत्येक दिवशी राहू आणि केतु यांचा एक निश्चित काळ असतो. आपल्याला हा काळ सोडून देवाची पूजा आराधना करायची आहे. तरंच त्याचे फळ मिळेल.मित्रांनो या राहू व केतूच्या वेळा काहीशा अशा आहेत, सोमवारी राहू काल सकाळी 7.30 ते 9 पर्यंत आणि केतु काळ दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत. मंगळवारी राहु काळ दुपारी 3 ते 4.30 पर्यंत तर केतुकाळ हा दुपारी 12 ते 1.30 पर्यंत.
बुधवारी राहू काळ दुपारी 12 ते 1.30 पर्यंत केतुकाळ सकाळी 10:30 ते 12 पर्यंत. गुरुवारी राहू काळ दुपारी 1:30 ते 3 पर्यंत. तर केतुकाळ सकाळी 9:30 पर्यंत 10.30 पर्यंत. शुक्रवारी राहू काळ 10:30 ते 12 पर्यंत. केतु काळ सकाळी 7.30 ते 9 पर्यंत.
शनिवारी राहूकाळ सकाळी 9 ते 10.30 पर्यंत. केतु काळ सकाळी 6 ते 7.30 पर्यंत. रविवारी राहुकाळ सायंकाळी 4.30 ते 6 पर्यंत. आणि केतु काळ दुपारी 3 ते 4.30 पर्यंत असतो.
आपण पूजा विधी करत असाल तर आपल्याला राहु आणि केतु काळ सोडून केली पाहिजे. तसेच केतू काळामध्ये एखाद्या निर्मनुष्य ठिकाणी जाणे देखील धोक्याचे मानलेले आहे. त्यामुळे केतू काळामध्ये निर्मनुष्य, निर्जन ठिकाणी जाणे टाळावे.
त्याचबरोबर राहू काळात शुभ काम कधीच करू नये ते पूर्ण कधीच होत नाही. कारण राहू व केतूचा प्रभाव प्रत्येक मनुष्यावर होत असतो, तो काहींच्या बाबतीत चांगला तर काहींच्या वाईट प्रभाव पडतो. या राहू-केतू काळामध्ये आपण त्यांना प्रसन्न करण्यासाठी राहू केतूची आराधना करायची आहे त्यामुळे दोष दूर होतो.
राहू काळामध्ये आपण “ॐ भ्रां भ्रीं भ्रौं सः राहवे नमः “
या मंत्राचा 108 वेळा आणि
“ॐ स्रां स्रीं स्रौं सः केतवे नमः”
या केतु मंत्राचा जप केल्यास आपले सर्व दुःख दूर होतात. सर्व कामे मार्गी लागतात व घरात सुख शांती निर्माण होते. तसेच जर हा मंत्र आपल्याला बोलायला जमत नसेल तर आपण भगवान श्री हनुमानजींचा
ओम नमो भगवते अंजनेय नमः
ओम नमो भगवते नमः
हे मंत्रजप केल्यास राहू-केतू-शनी दोष दूर होतात.