मित्रानो, यंदाच्या वर्षातील शेवटचं आणि दुसरं चंद्रग्रहण उद्या म्हणजेच 28 आणि 29 ऑक्टोबर 2023 च्या रात्री लागणार आहे. हे ग्रहण अनेक अर्थांनी विशेष मानलं जातंय. हे चंद्रग्रहण 2023 मधील एकमेव चंद्रग्रहण आहे जे भारतात दिसणार आहे. आतापर्यंत लागलेलं सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण भारतात दिसलं नाही. त्यामुळे त्यांचा सुतक काळही मानला जात नव्हता.
चंद्रग्रहण शरद पौर्णिमेच्या रात्री होणार आहे. अनेक दशकांनंतर शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रग्रहण लागणार असल्याने खास संयोग निर्माण झालाय. उद्या चंद्र मेष राशीमध्ये असणार आहे, यावेळी गुरु आधीच त्याठिकाणी उपस्थित आहे. अशा प्रकारे मेष राशीत चंद्र आणि गुरूचा संयोग गजकेसरी राजयोग तयार होणार आहे.
ज्योतिषशास्त्रामध्ये गजकेसरी राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. उद्या 28 ऑक्टोबर 2023 रोजी चंद्रग्रहण, शरद पौर्णिमा आणि गजकेसरी योगाचा महासंयोग होणार आहे. हा महान योगायोग काही राशींच्या व्यक्तींसाठी फार शुभ असणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना या महासंयोगाचा फायदा होणार आहे.
वृषभ रास
हे चंद्रग्रहण तुमच्या आयुष्यात सोनेरी दिवस आणणार आहे. व्यावसायिक जीवनात सुरू असलेल्या समस्या संपुष्यात येणार आहे. यावेळी रखडलेली कामं पुन्हा वेगाने सुरू होणार आहेत. करिअरमध्ये प्रगती होईल. तुम्हाला उच्च पद आणि वाढीव पगार मिळेल.
मिथुन रास
चंद्रग्रहणामुळे तुमचे आरोग्य सुधारणार आहे. यावेळी तुमचा तणाव कमी होईल. या काळात तुम्ही तुमच्या मेहनतीने सर्व कामे पूर्ण करू शकाल. घरगुती खर्चात कपात होऊ शकते. पैशाच्या प्रवाहाचे नवीन मार्ग तयार होतील. तुमच्या करिअरमध्येही प्रगती होईल.
कन्या राशी
चंद्रग्रहणाच्या दिवशी घडणारा योगायोग तुम्हाला भाग्याची साथ देईल. नोकरीत नवीन संधी मिळतील. गुंतवणुकीतून नफा मिळेल. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकता. तुमच्या उपजीविकेच्या साधनांमध्ये वाढ होईल. यावेळी नशीब तुम्हाला साथ देईल.
कुंभ रास
28 ऑक्टोबरपासून कुंभ राशीच्या लोकांसाठीही चांगला काळ सुरू होत आहे. नोकरीत तुम्हाला बढती मिळू शकते. व्यवसायात लाभ होईल. घरात सुख-शांती नांदेल. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही उच्च पदावर पोहोचू शकता. कुटुंबात आनंदाचे आणि आनंदाचे वातावरण राहील.