येत्या कोजागिरी पोर्णिमेला देवघरात नक्की ठेवा ही एक वस्तू माता लक्ष्मी धावत येईल!

28 ऑक्टोबर शनिवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा. या दिवशी माता लक्ष्मी संपूर्ण भुतलावर विचरण करते आणि कोण जागत आहे कोण नाही हे बघत असते. त्यामुळे या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आपण सुद्धा जागरण करा. आपल्या कुलदेवतेचे आपले इष्ट देवतेचे नामस्मरण करा. मंत्र जाप करा. यामुळे आपले जीवनातील तमाम समस्या दूर होतील.

मित्रांनो कोजागिरी पौर्णिमेची रात्र ही दैवी रात्र मानली जाते कारण या रात्री सर्व देवी देवता पृथ्वीवर अवतरीत होतात आणि चंद्र प्रकाशातून ज्या अमृतकनांचा वर्षाव होत आहे त्याचं लाभ घेतात. त्यामुळे मित्रांनो या कोजागिरीच्या रात्री जास्तीत जास्त चंद्रप्रकाश आपल्या शरीरावर कसा पडेल याची काळजी घ्या. मित्रांनो अशा या पुण्यदायी आणि लाभदायी कोजागिरी पौर्णिमेस धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय सुद्धा नक्की करा.

आपल्या घरात धनधान्य येण्यासाठी सुख-समृद्धी येण्यासाठी सोबतच माता लक्ष्मीचे स्थायी वास आपल्या घरामध्ये व्हावा, यासाठी कोजागिरी पौर्णिमेस दिवसभरात आणि रात्री सुद्धा ही एक वस्तू आपल्या देवघरात नक्की ठेवा. या ठिकाणी आम्ही तीन वस्तू सांगत आहोत यापैकी कमीत कमी एक तरी वस्तू आपल्या देवघरात ठेवायची आहे. यामुळे तुमचे जीवनातील धन संबंधित सर्व समस्या नाहीशा होतील.

माता लक्ष्मीच्या कृपेने घरात बरकत येईल कोजागिरी पौर्णिमेस आपल्या देवघरात नक्की कोणती वस्तू ठेवायची आहे. यातील सर्वात पहिली वस्तू म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेलच. मात्र ज्यांच्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नसेल तर त्यांनी या कोजागिरी पौर्णिमेस आपल्या देवघरात माता लक्ष्मीची एखादी मूर्ती किंवा फोटो नक्कीच स्थापित करा.

आता हा फोटो कसा असावा हेही लक्षात घ्या, मित्रांनो ज्या मूर्तीमध्ये किंवा फोटोमध्ये माता लक्ष्मी उभी आहे अशा घरात पैसा कधीच टिकत नाही. अशा घरांमध्ये पैशांची तंगी नसते. मित्रांनो लक्ष्मी ही मुळातच चंचल आहे, ती एक ठिकाणी राहत नाही त्यामुळे नेहमी आपल्या घरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यामध्ये माता लक्ष्मी ही बसलेली असावी आणि प्रसन्न मुद्रेत असावी.

आता दुसरी वस्तू आहे, ती म्हणजे कवडी. मित्रांनो मार्केटमध्ये या कवड्या मिळतात परंतु यातील काही कवड्या या विशेष फळ प्रदान करणाऱ्या असतात. त्यामुळे या कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर या पवित्र दिवशी आपल्या देवघरात एक कवडी नक्कीच स्थापित करा. माता लक्ष्मीचा स्थायी वास तुमच्या घरात होईल.

तिसरी वस्तू म्हणजे शंख. तुम्ही या शंखाची स्थापना कोणत्याही पौर्णिमेस किंवा शुक्रवारी सुद्धा आपल्या देवघरात करू शकता. फक्त यावेळी एक काळजी घ्यायची आहे की हा शंख आपल्या मंदिरात स्थापित करण्यापूर्वी आपण त्या शंकाच शुद्धीकरण करायचा आहे. ही पद्धत अगदी सोपी आहे. आपण हा
शंख घरात आणल्यानंतर एक लाल वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यावरती हा शंख स्वच्छ धुऊन ठेवायचा आहे.

या शंखमध्ये गंगाजल भरायच आहे. गंगाजल नसेल तर साधं पाणी जरी तुम्ही यामध्ये भरलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर या शंख समोर बसून हा शंख आपण देवघरा समोर ठेवायचा आहे, किंवा देवघरात स्थापित करायचा आहे.

Leave a Comment