वास्तूशास्त्रानुसार या दिशेला ठेवा ‘फिश टॅंक’, घराची होईल भरभराट!

अनेकांना घरी मासे पाळण्याचा छंद असतो. त्यामुळे बरेचजण घरातील फिश टॅंकमध्ये विविध प्रकारचे मासे पाळतात. वास्तुशात्रातही फिश टॅंक अथवा एक्वेरियम याला विशेष महत्व आहे, कारण घरातील फिश टँकचा मनुष्याच्या जीवनात बराच प्रभाव पडतो.

घरात मत्स्यालय असल्यास आपल्या घरात नकारात्मक उर्जा प्रसारित होत नाही. फिश टॅंकमधील पाण्याचा आवाज घरामध्ये सकारात्मक उर्जा आणि आनंदाचा प्रवाह वाढविण्यासाठी प्रभावी सिद्ध होतो. तसेच फिश टॅंक योग्य ठिकाणी ठेवल्यास घराची आर्थिक दृष्ट्या भरभराट देखील होते.

1. घराच्या पूर्व, उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेने फिश टॅंक ठेवणे शुभ मानले जाते. पाण्याच्या या दिशानिर्देशांमध्ये टॅंक ठेवल्याने त्याजागेतील सकारात्मक उर्जा वाढते.

2. फिश टॅंकचे पाणी वेळोवेळी बदलले पाहिजे, यामुळे घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते.
3. वास्तुशास्त्रानुसार मत्स्यालयातील पाणी स्थिर राहू नये, अन्यथा ही स्थिरता देखील आर्थिक प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करते.

4. घरातील फिश टॅंकमध्ये माशाची विशिष्ट संख्या असावी. फिश टॅंकमध्ये ९ मासे ठेवणे शुभ मानले जाते, त्यात आठ सोनेरी तर एक काळ्या रंगाचा मासा असावा.

5. विवाहित जीवनात परस्पर प्रेम टिकावे असे वाटत असेल तर फिश टॅंक हा मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला ठेवावा.

6. टॅंकमध्ये धुळ शेवाळ बसू देऊ नका, अन्यथा घरात बंधन येतात आणि प्रत्येक काम पूर्ण करण्यात अडथळे निर्माण होतील.

घरी फिश टॅंक ठेवण्याचे फायदे : 1. आपल्या घरात मासे असतील तर बाहेरून येणाऱ्या वाईट नजरेपासून स्वत:ला आणि आपल्या घराला सुरक्षीत ठेऊ शकतो.

2. मत्स्यालय ठेवणे केवळ त्या जागेचे सौंदर्यच वाढवते असे नाही तर माश्यांना पाहून मनाला स्फूर्ती मिळते, जेव्हा एखाद्याला तणाव जाणवतो, तेव्हा मत्स्यालयात तरंगत असलेल्या माशांना पोहताना पाहून त्याला सकारात्मक वाटू शकते. वास्तुच्या मते, फिश एक्वेरियमने केवळ आनंदच मिळत नाही तर घरातील सदस्यांवर येणाऱ्या सर्व आपत्ती टळतात.

3. वास्तुच्या नियमांनुसार घरात फिश टॅंक ठेवला तर घराची भरभराट होते.

4. फिश टॅंक जर स्वच्छ असेल आणि त्यातील मासे देखील आनंदी आणि निरोगी असतील तर तुमच्या संपत्तीत भर पडू शकते. 5. एक्वेरियमला योग्य दिशेने ठेवल्यास त्यामध्ये फिरणारी मासे घराची नकारात्मक ऊर्जा काढून टाकतात. आपल्या घरात लहान मत्स्यालयात मासे ठेवणे भाग्याचे मानले जाते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment