बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं चक्क बाथरुममध्ये लावला होता सलमान खानचा पोस्टर!

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा जेव्हा मैंने प्यार किया रिलीज झाला होता. तेव्हा तो एका रात्रीत स्टार बनला होता.

चित्रपटाच्या यशाने त्याला मोठा स्टार बनवले होते. त्यावेळी बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर त्याच्यावर फिदा झाली होती. ती इतकी फिदा झाली होती की तिने बाथरुममध्ये सलमान खानचा पोस्टर लावला होता. मात्र नंतर असे काही घडले की तिने सलमान खानचं पोस्टर फाडून टाकले आणि राहूल रॉयचे पोस्टर लावले होते. याबाबतचा खुलासा खुद्द सलमान खानने एकदा त्याचा शो दस का दममध्ये केला होता. सलमानने जे सांगितले ते ऐकून सर्वांना हसू आले होते.

सलमान खानने करिअरमध्ये करीना कपूर आणि करिश्मा कपूर या दोघींसोबत काम केले आहे. सलमानने करिश्मासोबत ‘जुड़वां’, ‘अंदाज अपना अपना’ आणि ‘जीत’ या चित्रपटात काम केले आहे. त्यावेळी करीना शाळेत शिकत होती. सलमान खानने करीनाशी संबंधीत एक किस्सा सांगितला. सलमान म्हणाला की, त्यावेळी मी आणि करिश्मा निश्चय चित्रपटाचे शूटिंग करत होतो. करिश्मा म्हणाली की, बेबोने तिच्या बाथरुममध्ये माझे पोस्टर लावले आहे. मात्र नंतर आशिकी रिलीज झाला आणि बेबोने माझा पोस्टर फाडून राहुल रॉयचं पोस्टर लावले. करीनानेदेखील स्वतः येऊन मला म्हटले होते की, सलमान आता माझ्या बाथरुममध्ये तुमचा पोस्टर नाही. आता राहुल रॉयचा आहे.

दस का दममध्ये तेव्हा करीना आणि करिश्माने हजेरी लावली होती. हे ऐकून करीनाला हसू आले होते. नंतर करीना मोठी झाल्यानंतर सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री केली. त्यानंतर तिने सलमान खानसोबत बऱ्याच चित्रपटात काम केले. यात बॉडीगार्ड, बजरंगी भाईजान आणि मैं और मिसेज खन्ना या सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचं तर सलमान खान टायगर३ आणि टायगर व्हर्सेस पठान यासारख्या चित्रपटात झळकणार आहे. तर करीना क्रू या चित्रपटात तबू आणि क्रिती सनॉनसोबत झळकणार आहे.

अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment