मित्रांनो, प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये काही अडचणी, संकटे तसेच चिंता या असतातच. कोणत्याही व्यक्तीला चिंता, अडचणी नाहीत असे होतच नाही. मग ती आर्थिक बाबतीत असू दे, आरोग्याच्या बाबतीत असू दे, उद्योगधंद्याच्या बाबतीत असू दे. कोणत्या ना कोणत्या बाबतीत चिंता ही मानवाला असतेच. या चिंता माणसाला खूपच हतबल करतात. या अडचणीमुळे माणूस आनंदी राहत नाही. तो सतत कोणत्या ना कोणत्या विचारात राहतो.
मित्रांनो, आपल्यापैकी स्वामींचे भक्त देखील भरपूर आहेत. ते श्रद्धेने, भक्तिभावाने स्वामींची सेवा करण्यात मग्न असतात. मित्रांनो स्वामी आपल्या भक्तांना सांगतात की, माझी सेवा करतोस मग तू चिंता का करतोस. हे वाक्य स्वामी आपल्या भक्तांना सांगत असतात. या वाक्याचा उद्देश असा आहे की, जे स्वामींचे सेवेकरी, भक्त आहेत. त्यांच्या जीवनात ज्या काही अडचणी, संकटे असतात ते संकटे सर्व स्वामींचे होतात व ही सर्व संकटे, अडचणी दूर करण्याचे काम स्वामी समर्थ करीत असतात.
अडचणीतून बाहेर ते आपल्या भक्ताला नक्की काढीत असतात. भक्तांनी, सेवेकर्यांनी फक्त मनोभावे व श्रद्धेने आपल्या स्वामींची सेवा करायची आहे. कोणत्याच गोष्टीची चिंता किंवा कोणत्याही अडचणींचा विचार सेवा करीत असताना करायचा नाही. स्वामींची सेवा करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा टेन्शन घेण्याची गरज नाही. तुमचे जे काही टेन्शन, अडचणी असतील ते सर्व तुम्ही स्वामी महाराजांवर सोपवा. तुम्ही फक्त मनोभावे व श्रद्धेने स्वामींची सेवा करा आणि आनंदी रहा.
जर तुम्हाला काही गोष्टींचे भरपूर टेन्शन येत असेल तर ते तुम्ही स्वामींसमोर जाऊन बोलून दाखवू शकता. ज्या गोष्टींचे तुम्हाला टेन्शन व भरपूर विचार येत असतील ती गोष्ट स्वामीसमोर बोलायची. ही गोष्ट तुम्ही स्वामीपाशी सोडून द्यायची आहे. त्या गोष्टी दूर करण्याचे काम स्वामी करतील. तुम्हाला आनंदी, सुखी, समाधानी ठेवतील.
अगदी विश्वास ठेऊन स्वामींची नितांत भक्ती करायची आहे. आपल्या सर्व अडचणी, संकटे स्वामी नक्कीच दूर करणार. आपण कोणत्याच गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. त्या सर्व काळजीतून सुटका श्री स्वामी समर्थ महाराज नक्कीच करतात.