आज रात्री करा हा उपाय देवी लक्ष्मीच्या कृपेने होतील आर्थिक समस्या दूर!

मित्रानो, ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारचा दिवस हा देवी लक्ष्मी आणि शुक्र ग्रहाला समर्पित आहे. शुक्र ग्रह हा प्रेम, सौंदर्य, समृद्धी आणि सर्जनशीलतेचा प्रतिक आहे. सौभाग्य, संपत्ती आणि सुख प्राप्तीसाठी शुक्रवारी काही उपाय करणे फायद्याचे ठरते.

या उपायाने शुक्र ग्रहासह माता लक्ष्मीची कृपा लाभत जीवनातील विविध समस्या दूर होतात. तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फायद्याची ठरु शकते. या लेखात आम्ही तुम्हाला शुक्रवारच्या काही उपायांबद्दल माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्याने तुम्हाला लाभ होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया शुक्रवारच्या उपायांसंदर्भात माहिती.

शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी, ओम शुम शुक्राय नमः किंवा ॐ हिमकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरुम् सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहं या मंत्रांचा जप करा. यासह मंदिरात जाऊन देवी लक्ष्मीला लाल वस्त्र, बिंदी, सिंदूर आणि बांगड्या अर्पण करा. या उपायाने सर्व समस्या दूर होतात.

शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित असून या दिवशी लक्ष्मी देवीच्या पूजेत साजूक तुपाचा दिवा लावणे शुभ ठरते. यासह शुक्रवारी मुंग्या आणि गायींना पीठ खाऊ घातल्याने सौभाग्य प्राप्त होते. यासह शुक्रवारी साखर, पांढरे वस्त्र, कापूर, दूध, दही इत्यादी पांढर्‍या वस्तूंचे दान करा.

देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी लाल कपडे परिधान करुन 7 शुक्रवार रात्री नियमितपणे साजूक तुपाचा दिवा लावा. तुपाच्या दिव्यावर केशर टाकावे. कापसाची वात वापरण्याऐवजी मोळी किंवा पूजेच्या पंचरंगी धाग्याची वात करून लक्ष्मी देवीसमोर दिवा लावा, या उपायाने तुम्हाला कधीच आर्थिक चणचण भासणार नाही.

Leave a Comment