नोव्हेंबरपासून ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? शुक्रदेव गोचर करताच माता लक्ष्मीच्या कृपेने होऊ शकता लखपती

नोव्हेंबरपासून ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसाज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या कालावधीनुसार राशीचक्रात भ्रमण करत असतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी एक ठरावीक कालावधी असतो. मात्र काही ग्रह दीर्घ कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतात. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहांची स्थिती महत्त्वाची असते. शुक्र ग्रह सुख वैभव, आरामदायी जीवन आणि भौतिक सुखांचा कारक आहे. त्यामुळे शुक्राची स्थिती खूपच महत्त्वाची ठरते. सध्या शुक्र ग्रह सिंह राशीत असून नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच कन्या राशीत प्रवेश करणार आहेत, त्यामुळे काही राशींना फायदा होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

‘या’ राशींचे भाग्य चमकणार?

वृषभ राशी
या राशीच्या लोकांसाठी शुक्र गोचर लाभदायी ठरु शकतो. या राशीतील मंडळींना करिअरमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. सध्या करत असलेल्या नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती आणि चांगली पगारवाढ मिळू शकते. तसेच जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकतो. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. या काळात प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. जुन्या आजारातून या काळात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन राशी
शुक्र गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरु शकतो. नोकरीत पदोन्नती, फायद्याचे दिवस, अभ्यासात यश, सन्मान मिळण्याची शक्यता आहे. प्रदीर्घ समस्या दूर होऊ शकतात. मालमत्तेच्या गुंतवणुकीतून चांगला नफा, मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकते. उत्पन्नाची नवीन साधने निर्माण होऊ शकतात. व्यवसायात नफा मिळू शकतो, आकस्मिक धनलाभ होऊन नात्यात गोडवा येऊ शकतो.

कन्या राशी
शुक्रदेव कन्या राशीत गोचर करत असल्याने या राशीतील लोकांसाठी सुखाचे दिवस येऊ शकतात. उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होऊ शकतात. आर्थिक मिळकतीचे नवे मार्ग वाढू शकतात. प्रेमाची साथ लाभल्याने मानसिक ताण दूर होऊ शकतात. ज्या गोष्टी मिळवण्यासाठी मेहनत घ्याल त्या यशस्वी होऊ शकतात. वडीलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता असून मोठा धनलाभ होऊ शकतो.

Leave a Comment