नोकरीमध्ये बढती तसेच व्यावसाय तेजीत चालण्यासाठी, बरकत येण्यासाठी करा फक्त स्वामींची ‘ही’ सोपी सेवा!

मित्रांनो, नोकरी लागण्यासाठी किंवा आपली सध्या असलेल्या नोकरीमध्ये बढती मिळवण्यासाठी, बरकत येण्यासाठी फक्त स्वामींची ही सोपी सेवा करा आपली सर्व कार्येही मार्गी लागतील. मित्र, मैत्रिणींनो, कुणाला नोकरीच्या समस्या आहेत. तर काही जणांना लागलेल्या नोकरी मध्ये प्रमोशन मिळत नाही बढती होत नाही. तर काही जणांना पगार वाढीसाठी अडचणी आहेत.

नोकरीमध्ये वरिष्ठांकडून तक्रारी आहेत. याच पद्धतीने व्यवसायामध्ये वेगवेगळ्या अडचणी आहेत. व्यवसाय वाढत नाही. काही केल्या दुकानांमध्ये गिराईक येत नाही. गिऱ्हाईक आल्यास व्यवहार जमत नाही. अथवा या ना त्या वेगवेगळ्या कारणाने गिऱ्हाईक परत जात आहे. याच बरोबर घरात धनधान्य टिकत नाही. पैसा अडका शिल्लक राहत नाही. घरात अडचणी वाढत आहेत. अशा वेगवेगळ्या अनेक समस्यांनी अनेक जण ग्रासलेले असतात.

या अशा एक ना अनेक प्रकारच्या अडचणी साठी अनेक जण वेगवेगळे उपाय शोधत असतात. अशा सर्वांसाठी आम्ही आजच्या या विशेष लेखांमध्ये स्वामींची एक सोपी सेवा सांगणार आहोत की ज्यामुळे वरील सर्व अडचणी दूर होतील आणि आपली सर्व कार्य मार्गी लागतील. आपणाला यश प्राप्त होईल.

स्वामींच्या या सेवेने चांगली नोकरी मिळेल. नोकरीमध्ये बढती मिळेल. आपला व्यवसाय चांगल्या रीतीने वाढत राहील. याचा अनेकांनी लाभ घेतला आहे आणि त्यांना त्यांच्या मनासारखा लाभही मिळाला आहे.

या सेवेतील पहिला भाग म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण चा 14 वा अध्याय नित्यनियमाने वाचावा. हा अध्याय रोज सकाळी स्नान केल्यानंतर वाचावा. दुसरा भाग म्हणजे गणपती अथर्व शिष्य चे नित्यनियमाने पठण करावे.

तिसरा भाग व्यंकटेश स्तोत्र रोज तीन वेळा म्हणावे.
चौथा भाग शनिवारी उपवास करावा,वेळ मिठाचे खावे व एक वेळ कुठलीही फळे खावीत. याचबरोबर दूध चहा घेऊ शकता.

पाचवा भाग म्हणजे रोज स्वामी समर्थ जप माळ किमान तीन वेळा पूर्ण कराव्यात.सहावा भाग म्हणजे गणपतीला रोज दुर्वाच्या तीन जुडवा वहाव्यात. यासाठी शुक्ल पक्षाच्या मुहूर्तावर बुधवारपासून सुरुवात करावी.

वरील सर्व समस्येबाबत यापैकी कोणतीही एक सेवा करावी. त्यामुळे आपणाला नक्कीच यश लाभेल. यापैकी ज्या सेवा जमतील त्या कितीही वेळा केल्या तरी चालतील. किंवा सर्व सेवा जमत असतील तर सर्वच्या सर्व केल्या तरी चालतील.

मित्रांनो या सेवा करताना यामध्ये आपले सातत्य हवे. एखादा महिना केला आणि लाभ मिळेना असे म्हटले तर ते योग्य ठरणार नाही.

तरी या सेवांमध्ये सातत्य हवे त्याचबरोबर आपले प्रयत्नही असले पाहिजेत. नित्यनियमाने सेवा करत राहिल्यास आपण करत असलेल्या प्रयत्नाला लवकर व आपल्या मनाजोगे यश प्राप्त होते हे मात्र आम्ही खात्रीशीर रित्या सांगू इच्छितो. सर्व सेवा श्रद्धेने करा. स्वामींचे नामस्मरण करा.

Leave a Comment