14 ऑक्टोबरला या वर्षातील शेवटची शनि अमावस्या! या राशींना शनिदेवाच्या प्रकोपापासून मिळणार आराम

सनातन धर्मात अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. यंदाची अमावस्या अतिशय खास आहे. कारण पंचांगानुसार यंदा सर्वपित्री अमावस्या आणि शनि अमावस्या या दुर्मिळ योग जुळून आला आहे. त्याशिवाय या दिवशी सूर्यग्रहणदेखील आहे. अमावस्येच्या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शाती आणि समाधानासाठी पितृ तर्पण केलं जातं. यंदात सर्वपित्री अमावस्या आहे. अमावस्येला काल सर्प दोष निवारण पूजा केल्यास त्यापासून मुक्ती मिळते.

शनि अमावस्या जेव्हा शनिवारी येते त्याला शनिश्चर अमावस्या असं म्हटलं जातं. यंदा शनि अमावस्या 14 ऑक्टोबरला असणार आहे. यादिवशी शनिदेवाची साडेसाती आणि धैय्यापासून प्रभाव कमी करण्यासाठी पूजा आणि उपाय केल्यास लाभ होईल. त्याशिवाय शनिदेवाचा काही राशीच्या लोकांवरील प्रकोप संपणार आहे.

मेष राशी
शनिश्चरी अमावस्या मेष राशीच्या लोकांना शनिदेवाच्या वाईट प्रकोपापासून मुक्ता मिळणार आहे. यासाठी त्यांना पितरांच्या आत्म्याच्या शांती आणि समाधानासाठी पितृ तर्पण करावं. तसंच शनि मंदिरात रात्री तिळाच्या तेलाचा दिवा लावणं शुभ मानलं जातं. लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही पूजा कराल तेव्हा शनिदेवाच्या पायाकडे पाहा. त्याशिवाय घराबाहेरच प्रसाद खावा आणि पाणी शिंपडल्यावरच घरात प्रवेश करावा.

तूळ राशी
हा काळ तूळ राशीच्या आयुष्यात नवीन वळण घेईन येणार आहे. या काळात शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होणार असून तुम्हाला त्यांच्या वाईट प्रभावापासून मुक्त मिळणार आहे. या दिवशी शनिदेवाची यथासांग पूजा करा. वडीलधाऱ्यांचा सल्ला घेऊनच पुढचे कोणतेही करणे तुमच्यासाठी हिताचे असेल.

मकर राशी
शनिश्चरी अमावस्याला मकर राशीच्या लोकांवरील सर्व वाईट प्रभाव दूर होणार आहे. तुमची सर्व बिघडलेली कामे मार्गी लागणार आहेत. कार्यक्षेत्रात येणारे सर्व अडथळे हळूहळू दूर होणार आहे. या दिवशी तुम्ही पूर्ण मनाने आणि ध्यानाने शनिदेवाची उपासना केल्यामुळे तुम्हाला अपेक्षित परिणाम दिसणार आहे.

Leave a Comment