मित्रांनो, वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ऑक्टोबर महिना खूपच महत्त्वाचा असणार आहे. कारण या महिन्यात अनेक ग्रहांच्या चालीमध्ये मोठे बदल होणार आहेत. या महिन्यात अनेक ग्रहांच्या राशी बदलामुळे तूळ राशीत ‘चतुर्ग्रही योग’ तयार होणार आहे. हा योग १९ ऑक्टोबरला मंगळ, केतू, बुध आणि सूर्यदेवाच्या युतीमुळे बनणार आहे. हा योग बनल्याने काही राशींना धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या राशी…
मिथुन राशी
चतुर्ग्रही योग मिथुन राशींच्या मंडळीसाठी लाभदायी ठरु शकतो. या राशीतील लोकांना आर्थिक लाभासह मानसिक सुखशांती लाभण्याची शक्यता आहे. या राशीतील लोकांचे कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाऊ शकते. या काळात कुंटुबातील व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळू शकतो. धार्मिक कार्य करण्याची संधी मिळू शकते. या राशीतील लोकांना या काळात वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होण्याची शक्यता आहे.
कन्या राशी
कन्या राशीतील लोकांना चतुर्ग्रही योग बनल्याने या काळात नशिबाची उत्तम साथ लाभू शकते. जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकतो. या कालावधीत महागडी वस्तू खरेदी करू शकता. या काळात तुम्ही विदेशवारीला जाण्याचा विचारही करू शकता. मार्केटिंग आणि सल्लागार क्षेत्राशी संबंधित लोकांना या काळात सकारात्मक फळ मिळू शकते. या राशीतील लोकांची आर्थिक स्थिती या काळात मजबूत राहू शकते.
मकर राशी
चतुर्ग्रही योग बनल्याने मकर राशींच्या लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी येऊन तुमच्या जीवनातील सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. या राशीतील व्यावसायिकांना भरघोस नफ्याच्या संधी मिळू शकतात. मालमत्तेबाबत काही वाद सुरू असतील, तर त्यात तुम्ही जिंकूही शकता. या काळात तुमच्या जोडीदाराशी संबंध चांगले राहू शकते. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होऊ शकतात. एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी चांगला जाऊ शकतो.