ज्योतिषशास्त्रात, शुक्र हा अतिशय शुभ ग्रह मानला जातो. तो संपत्ती, वैभव, ऐश्वर्य, भोग याचा कारक आहे. जेव्हा व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत असतो, तेव्हा पैसा, संपत्ती, सुख आणि सुविधा यांची कमतरता नसते. ज्यावेळी शुक्राचं गोचर होतं तेव्हा ते व्यक्तीवर विशेष प्रभाव टाकतं. आता २ ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. शुक्रदेव ३ नोव्हेंबरपर्यंतच सिंह राशीत राहतील. त्यामुळे काही राशींना पैसा, संपत्ती, सुख मिळण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींचे नशीब पालटणार?
वृषभ राशी
या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. त्यामुळे शुक्रदेवाची वृषभ राशींच्या लोकांवर नेहमीच कृपा असते. या राशीतील मंडळींना या काळात पद, प्रतिष्ठा, मालमत्तेच्या गुंतवणुकीतून चांगला नफा, मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे. आकस्मिक धनलाभही होऊ शकतो.
मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्रदेवाचे गोचर फायदेशीर ठरु शकते. उत्पन्नाची नवीन साधने निर्माण होऊ शकतात. व्यवसायात नफा मिळू शकतो, नोकरदारांना पदोन्नती व वेतनवाढ होऊ शकते. पद आणि प्रतिष्ठेत वाढ होऊ शकते.
कन्या राशी
कन्या राशीच्या व्यवसायिकांसाठी हा काळ उत्तम ठरु शकतो. शेअर बाजार, लॉटरी या माध्यमातून अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती आणि चांगली पगारवाढही मिळू शकते. या काळात कौटुंबिक वातावरण चांगलं राहू शकतो.
धनु राशी
धनु राशीच्या मंडळींची या काळात कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत स्थिती सुधारु शकते. नशिबाची साथ मिळाल्याने व्यवसायात भरपूर नफा होऊन पैसा वाचवण्याच्या संधीही मिळू शकतात. कौटुंबिक जीवनात सुरू असलेल्या समस्या दूर होऊन जोडीदारासोबत नाते घट्ट होऊ शकतात.
कुंभ राशी
कुंभ राशींच्या लोकांसाठी शुक्राचे गोचर लाभदायी ठरु शकते. या काळात प्रलंबित असलेली कामे पुन्हा मार्गी लागू शकतात. प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊन धनलाभ होऊ शकतो. गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. अविवाहित लोकांना चांगली बातमी मिळू शकते.